मनोज जरांगेंचे मुस्लिम मराठा दलित ‘ऐक्य’चे गणितं कोथरूडचे चित्रं बदलवणार? ही भेट चर्चेत!

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघ सलग तिसरा विजय साकार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्व सोयीस्कर डावपेच (सोयीचे विरोधातील उमेदवार) आखलेले होते; परंतु मनोज जरांगे पाटीलांच्या नव्या भूमिकेने मुस्लिम मराठा दलित या समुदायांची निर्णायक मते कोथरूड विधानसभा मतदारसंघाची गणिते बिघडण्यास भाग पडण्याची शक्यता आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे क्रमांक दोनचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामगार मंत्री चंद्रकांत दादा पाटील सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे असून पुन्हा विजय करत सलग तिसरा विजय साकारण्यासाठी मोर्चे बांधणी करत आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्याचा संघ निवडणूक सुरू होण्याच्या काही वर्षांपासूनच आखण्यात आला होता त्याचाच भाग म्हणून विरोधातील उमेदवारही अचानक बदलल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सर्वच विरोधकांनी आपली प्रबळ दावेदारी व्यक्त करत विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली खरी परंतु पक्षीय बंधने अन वरिष्ठांची मर्जी या सर्व गोष्टींमुळे त्यांचे हेतू साध्य झाले नाहीत परिणामी कोथरूड विधानसभा सरळ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जाईल की काय अशी चर्चा सुरू असतानाच कोथरूड भागातील बहुजनांचे आश्वासन केंद्र विजय डाकले यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कोथरुड विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या शक्ती प्रदर्शनाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पार्टीचे बंडखोर उमेदवार विजय डाकले यांनी थेट अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलन प्रणेते मनोज जरांगेपाटील यांची भेट घेऊन कोथरूड विधानसभा मतदारसंघाची समीकरणे सादर केली. अन् काही तासातच मनोज जरांगेपाटील यांच्यामार्फत ‘दलित मुस्लिम मराठा’ एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कोथरूड विधानसभा मतदारसंघाची विजयाची गणिते बिघडलेली आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा आंदोलन प्रणेते म्हणून जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार चार ते पाच जणांनी अपक्ष अर्ज भरले असले तरीसुद्धा सध्या कालीन परिस्थिती विचारात घेता या मतदारसंघांमध्ये ‘मराठा’ उमेदवार देण्यापेक्षा अन्य जातीतील उमेदवाराला संधी दिल्यास भारतीय जनता पक्षाची घोडदौड रोखणं शक्य असल्याची जाणीव म्हणून जरांगे पाटील यांना करून दिल्याची माहिती राष्ट्रवादी बंडखोर उमेदवार विजय बापू डाकले यांनी मनोज जरांगेपाटील यांना समजून सांगितल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे.