अजित पवारांनी सांगितलं उमेदवारी मागे घ्या, तर?, वाचा नवाब मलिकांच उत्तर

0

महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजपाचा नवाब मलिक यांना विरोध आहे. त्यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला जातो. याच मुद्यावर त्यांना प्रश्न विचारले. किरीट सोमय्या, आशिष शेलार तुमच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तीचा प्रचार करणार नाही, असं महायुतीकडून म्हटलं जातय. “असे आरोपी कोणी करत असेल, तर मी नोटीस पाठवली आहे, पाठवणार आहे. काही मोठ्या वर्तमानपत्रांनी अशा बातम्या दिलेल्या पण ते आता थांबले आहेत” असं नवाब मलिक म्हणाले.

“माझ्यावर दाऊदशी संबंध असल्याचे जे आरोप करतात, त्यांच्यावर मी न्यायिक कारवाई करणार आहे. असे आरोप करणाऱ्य़ांविरोधात मी न्यायालयात जाणार. त्यांच्यावर खटला दाखल करणार. हे सर्व बिनबुडाचे आरोप आहेत. त्यांच्याविरुद्ध खटला दाखवल करणार. माझ्यावर मनी लॉन्ड्रीगचे आरोप झालेले. कितीही मोठा नेता असला, तरी मी कायदेशीर कारवाई करणार” असं नवाब मलिक म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

‘मी आग्रह धरत नाही की, तुम्ही प्रचाराला या’

देवेंद्र फडणवीस म्हणतात, आशिष शेलारांची जी भूमिका, तीच माझी भूमिका. त्यावर नवाब मलिक म्हणाले की, “नका करु माझा प्रचार. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आहे. मी आग्रह धरत नाही की, तुम्ही प्रचाराला या. जे दाऊदशी माझं नाव जोडतात, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार”

अजित पवारांनी सांगितलं उमेदवारी मागे घ्या, तर?

शिवाजीनगर-मानखुर्दमधून तुम्ही दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. एक अपक्ष आणि दुसरा राष्ट्रवादीच्या तिकीटावर, उद्या अजित पवारांनी तुम्हाला घड्याळावरील अर्ज मागे घ्या, असं सांगितलं, तर तुम्ही ऐकणार का? त्यावर नवाब मलिक म्हणाले की, “तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. आता कोणी उमेदवारी मागे घेऊ शकत नाही. तो अधिकार माझा आहे. कोणी सांगितलं हा आमचा उमेदवार नाही, तर तशी परिस्थिती होऊ शकत नाही. राष्ट्रवादीनेच मला एबी फॉर्म दिलाय. माझ्यावर विश्वास टाकला आहे. भाजपा विरोधात असली, तरी मी एनसीपी म्हणून निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार’’

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन