राज्यसभेसह इतर पोटनिवडणुकांची तयारी

0

 महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा आणि इतर राज्यांत ५० विधानसभा तसेच लाेकसभेच्या काही जागांसाठी पाेटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयाेग जम्मू-काश्मीरमधील राज्यसभेच्या चार जागा व इतर राज्यांतील पाेटनिवडणुकीसाठी देखील तयारी करीत आहेत.सध्या २३१ सदस्य संख्या असलेल्या वरिष्ठ सभागृहात भाजपचे ९५ सदस्य आहेत. या सभागृहात १२ जागा रिक्त असून, यात जम्मू-काश्मीरमधून ४, आंध्र प्रदेशातून ४, नामनिर्देशित सदस्यांच्या ४ तर ओडिशा आणि हरयाणातून प्रत्येकी एक जागांचा समावेश आहे. वायएसआर काँग्रेसचे दोन आणि बिजदच्या एका सदस्याने राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. त्यापैकी बिजद सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

जम्मू-काश्मीरच्या ४ जागांचे गणित

जम्मू-काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सरकारचा शपथविधी झाल्यानंतर राज्यातील राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होईल. यात नॅकाँ व काँग्रेस युतीस तीन जागांवर विजय अपेक्षित आहे. यामुळे सभागृहातील काँग्रेस-माकप व आप तसेच इतर ५ अपक्ष, अशी या आघाडीची संख्या ५५ पर्यंत जाऊ शकते. यात भाजपला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

यांना संधी मिळण्याची शक्यता

  • नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा फारुख अब्दुल्ला यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता.
  • भाजपकडून माजी उपमुख्यमंत्री निर्मलसिंह आणि कविंदर गुप्ता यांच्यापैकी एकास संधी मिळेल.