आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात, मनसेच्या 45 उमेदवारांची घोषणा, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

0
41

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात काँटे की टक्कर असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल डोंबिवली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली होती. राज ठाकरे यांनी आपल्या 5 मिनिटांच्या भाषणात राजू पाटील यांना कल्याण ग्रामीण आणि अविनाश जाधव यांना ठाणे मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे 225 ते 230 जागांवर निवडणूक लढवेल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे मनसेकडून आणखी उमेदवारांची घोषणा होऊ शकते. विशेष म्हणजे राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकही पार पडली होती. त्यामुळे राज ठाकरे महायुतीसोबत जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी पाहता राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकला चलोचा नारा दिलेला बघायला मिळतोय.

मनसेकडून कुणाकुणाला उमेदवारी जाहीर?
कल्याण ग्रामीणमधूम राजू पाटील, माहीममधून अमित ठाकरे, भांडुप पश्चिम मतदारसंघातून शिरीष सावंत, वरळीतून संदीप देशपांडे, ठाणे शहरमधून अविनाश जाधव, मुरबाड मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संगिता चेंदवणकर यांची बदलापूर अत्याचार प्रकरणात लावून धरण्यात निर्णायक भूमिका ठरली होती.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

पुण्यात कोथरुडमधून किशोर शिंदे, हडपसर येथून साईनाथ बाबार, खडकवासलातून मयुरेश वांजळे, मागाठाणे येथून नयन कदम, बोरीवलीत कुणाल माईणकर, दहिसर मतदारसंघातून राजेश येरुणकर, दिंडोशीतून भास्कर परब, वर्सोवा मतदारसंघातून संदेश देसाई, कांदिवली पूर्वेतून महेश फरकासे, गोरेगाव येथून विरेंद्र जाधव, चारकोप दिनेश साळवी, जोगेश्वरी पूर्वेतून भालचंद्र अंबुरे, विक्रोळीत विश्नजित ढोलम, घाटकोपर पश्चिममधून गणेश चुक्कल, घाटकोपर पूर्वेतून संदीप कुलथे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.