पुण्यात स्कूल वाहनं 50%योग्यता प्रमाणपत्र हजार स्कूल व्हॅनची नोंदणी ऑनलाईन होणार;१५ दिवसांची मुदत

0

मागच्या काही दिवसांपासून पुण्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. लैंगिक शोषण, विनयभंग हे प्रकार सातत्याने घडत आहेत. मागच्याच महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार झाला होता.तर दुसऱ्या घटनेमध्ये महाविद्यालयीन तरुणीचं लैंगिक शोषण झालं होतं.

अल्पवयीन मुली वासनेच्या शिकार होत असल्याने, अशा घटना थांबाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता पुण्यातील शाळा, महाविद्यालयांकडे असलेल्या वाहनांची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. पुणे आरटीओ प्रशासन अॅक्शन मोडवर आलेलं आहे.

पुण्यात सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी त्यांच्याकडे असलेल्या स्कूल व्हॅन, बसची माहिती आरटीओच्या वेबसाईटवर येत्या १५ दिवसांत भरायची आहे. तसे आदेश पुणे आरटीओने दिले आहेत. ज्या शाळा ही माहिती भरणार नाहीत त्यांना शिक्षण विभागाही नोटीस बजावणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

पुण्यात वानवडी परिसरात स्कूल व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. शहराच्या अन्य भागातही अशा घटना समोर येत आहेत. यापार्श्वभमीवर सतर्कता बाळगली जात असून शहरात सहा हजार स्कूल व्हॅनची नोंदणी असताना त्यापैकी ६० टक्केच स्कूल व्हॅन चालकांनी योग्यता प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले होते.