विश्र्वशांती विद्यापीठ डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना समर्पित जीवन पुरस्कार

0
1

मुंबई :- पुण्याच्या एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाच्या वतीने संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल “समर्पित जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. लोणी काळभोर येथे होत असलेल्या जागतिक विश्र्वशांती परिषदेत दि‌. ४ ऑक्टोबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे संयोजक एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड व भारताच्या महासंगणकाचे जनक शास्रज्ञ डॉ.विजय भटकर यांनी कळविले आहे.

एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सोलापूर सारख्या जिल्ह्यातून पत्रकारितेचे धडे गिरवत आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक नव माध्यम डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनाची निर्मिती करून संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्या होतकरू तरुणांची एक चळवळ उभी केली असून या कार्यामुळे महाराष्ट्रात पत्रकारितेमध्ये एक समर्पक पर्याय तयार झाला आहे. गेली चार दशक केलेल्या समर्पित कार्याची दखल घेऊन जीवन पुरस्कार देण्यात आला आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

जगातील शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि विश्र्वशांती चळवळीतील विचारवंत सहभागी होत असलेल्या दहाव्या जागतिक विश्र्वशांती परिषदेचे आयोजन दि.३,४ व ५ ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर येथील विश्वराज बाग येथे करण्यात आले आहे.