एन्काउंटरवर माझाही विश्वास नाही, पण…’; शाळेतील ट्रस्टी तीन आरोपीवरही फडणवीसांचं मोठं जाहीर विधान

0
2

मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या चकमकप्रकरणी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये बोलताना एक मोठं विधान केलं आहे. अक्षय शिंदे या चकमकीबाबत अनेकांनी सरकारचं कौतुक केलं आहे. मात्र, असं असलं तरीही याबाबत देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस बदलापूर चकमकीबाबत नेमकं काय म्हणाले?

प्रश्न: अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी कोर्टात जी सुनावणी झाली त्यावेळी कोर्टाने तुमच्या सरकारला खडे बोल सुनावले आहेत. याशिवाय अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. काही लोकं या एन्काउंटरने खुश आहेत. पण अनेक जण असेही आहेत की ज्यांना अशा पद्धतीने झालेलं एन्काउंटर आवडलेलं नाही. तुम्ही कसं बघता याकडे…..

देवेंद्र फडणवीस: पहिली गोष्ट ही आहे की, माझा एन्काउंटरवर विश्वास नाही. एन्काउंटरवर आम्ही विश्वास ठेवतच नाही. माझं असं म्हणणं आहे की, कोणत्या न्यायप्रक्रियेत कायदा पाळला गेलाच पाहिजे. त्यानुसारच जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे.. हो ती शिक्षा वेळेत मिळाली पाहिजे. या केसच्या चौकशीमध्ये येईल की, बंदूक का काढली.. बंदूक हातात कशी गेली हे सगळं चौकशीत येईलच. पण जर एखादा गुन्हेगार बंदूक खेचून आमच्या पोलिसांवर गोळ्या झाडतोय तर आमचे पोलीस काय टाळ्या वाजवत बसणार नाही.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

पोलीस गोळ्या चालवणार.. आणि पोलिसांनी गोळ्या चालवल्या.. आपल्या संरक्षणासाठी चालवली आणि पोलिसांनी गोळ्या चालवून.. आता तुम्ही त्याला एन्काउंटर म्हणा किंवा.. आपल्या संरक्षणासाठी केलं म्हणा.. हा सगळा आता चौकशीचा भाग आहे.

मी काही न्यायमूर्तींबाबत टिप्पणी करणार नाही. पण काही लोकं बोलतात की, इथेच का मारलं तिथेच का गोळी मारलं? अरे तुमच्यासमोर कोणी बंदूक घेऊन उभं राहिलं आणि गोळ्या झाडतोय तर काय तुम्ही हा विचार कराल का? की, इथे मारायचं की तिथे मारायचं? असं नाही होत.. जिथे लागतं तिथेच मारावं लागेल ना..

प्रश्न: हायकोर्टाने हे विचारलं की, डोक्यात गोळी कशी मारली गेली. तुम्ही पायावर गोळी मारू शकत होता… या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल?

देवेंद्र फडणवीस: 100 टक्के याची निष्पक्ष चौकशी होईल.. हा व्यक्ती न्यायालयीन कोठडीत होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या व्यक्तीचा कसाही मृत्यू झाला तरी त्याची चौकशी ही करावीच लागते. फक्त माझी अपेक्षा ही आहे की, काल घटना घडली आहे आज त्याची चौकशी सुरू झाली आहे. पण आजच इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी दिली जातील? गोळी इकडेच कशी लागली, तिकडेच कशी लागली.. असं नाही होतं. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट टिप्पणी केलेली आहे की, मला वाटतं की, पोलिसांना त्यांचं काम करू द्यावं. सीआयडी चौकशी करेल त्यात सगळी माहिती समोर येईल.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

प्रश्न: या एन्काउंटरनंतर सगळीकडे शिवसेना, भाजप यांचे कार्यकर्ते होर्डिंग्स लावत आहेत. तुमचेही होर्डिंग लागले आहेत बंदूक हातात घेतलेले.. तुमचं काय म्हणणं?

देवेंद्र फडणवीस: माझं म्हणणं आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही होर्डिंग्सचं मी समर्थन करत नाही. या प्रकारे होर्डिंग्स लावणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. याप्रकारे या घटनेचा उदो-उदो होता कामा नये. हे मानणारा मी व्यक्ती आहे. पण ही गोष्ट वेगळी आहे की, लोकांना एक प्रकारे तात्काळ न्याय मिळाला तशी लोकांची भावना असते. तीच भावना दिसून येते.. पण अशी भावना तयार होणंही ठीक नाहीए. पण या घटनांबाबत खूप गंभीरपणे आपल्याला विचार करावा लागेल.

प्रश्न: आता या गोष्टीला योगीराज म्हटलं जात आहे..

देवेंद्र फडणवीस: एक लक्षात घ्या.. हे जे सोशल मीडिया कम्युनिटी आहे ती ना तुमच्या हातात आहे ना आमच्या.. जेव्हा ठोकायचं असेल तेव्हा असं ठोकतात की, तुम्ही त्यांना रोखू शकत नाही.

प्रश्न: मात्र, काही गोष्टी दिसतात ना.. असे काही अधिकारी आहेत की, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्डच असा आहे की, त्यांच्यावर पहिले देखील आरोप झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस: ही गोष्ट समजून घ्या… टाइमलाइन बघा.. बदलापूरच्या घटनेनंतर आम्ही चौकशी करून घटनेची चार्जशीट पण दाखल केली आहे. त्यानंतर ही दुसरी केस आली.. हा जो व्यक्ती होता त्याने तीन लग्न केली होती. त्याच्या एका बायकोने त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराबाबत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे नवी चौकशी सुरू झाली. मला असं वाटतं की, प्लॅन करून करायचं असतं तर तात्काळ केलं असतं ना.. लोकांचा जेव्हा राग होता तेव्हाच केलं असतं ना..

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

एवढा वेळ झाल्यावर कोणी प्लॅन करून थोडीच करतं ना.. मला वाटतं की, या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की, त्याने पोलिसांवर गोळ्या चालवल्या. तो घोर गुन्हेगार होता. तो काही साधूसंत नाही.. त्याने जर पोलिसांवर हल्ला केला तर माझे पोलीस हे शांत बसणार नाहीत.. ते उत्तर देणारच आणि त्यांनी ते दिलंच.

प्रश्न: जे इतर तीन आरोपी आहेत.. ते शाळेतील ट्रस्टी आहेत आणि भाजपशी संबंधित आहेत. त्यांना वाचविण्यासाठी हे केलं गेलं असा आरोप लावला जात आहे.

देवेंद्र फडणवीस: शाळेची जी संस्था आहे.. त्या संस्थेत प्रत्येक पक्षाशी संबंधित व्यक्ती आहे. अनेक वर्ष तर उद्धव ठाकरेंच्या पक्षातील लोकं ही ती संस्था चालवत होते. जिथवर ट्रस्टींचा प्रश्न आहे त्यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत कारवाई केली गेली आहे. त्यांनी अटकपूर्व जामीन मागितला होता. त्याला आम्ही विरोध केला. त्यामुळे तो जामीन नाकारण्यात आला आहे. जी कारवाई करायची आहे ती सरकारने केली आहे.