मुंबईत ठाकरेंना खंत शिंदे नव्हे भाजपा ९९% स्ट्राईक रेट; महायुतीही भाजपा सावध शिंदे गटाला या जागा निश्चित?

0

लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणारय. दरम्यान विधानसभेसाठी मविआत ठाकरे गट आणि शरद पवार गटाचं जागावाटप निश्चित झाल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. मात्र, या जागावाटपात सर्व पक्षांचं लक्ष आहे त्या मुंबईतील 36 जागांवर. मुंबईत लोकसभेच्या लढतीमध्ये चार पैकी तीन जागा जिंकत मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन जागीही विजय मिळवून आपली ताकद दाखवली असली तरी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना खरी खंत बंडखोर एकनाथ शिंदे यांची नवे तर मित्र म्हणून मुंबईमध्ये शिरकाव केलेल्या भाजपाची असून शिवसेनेच्या मदतीने 2019च्या निवडणुकीमध्ये ९९% स्ट्राईक रेट च्या जीवावर वाढलेले बळ कमी करणे ही आहे. महायुती महायुतीच्या मार्फत मुंबईतील लढत शिंदे विरुद्ध ठाकरे करण्याची खेळी केली जात असताना उद्धव ठाकरे यांना मात्र मुंबईमध्ये शिरगाव केलेल्या भाजपला रोखणे हेच मोठे आव्हान आहे. भाजपाला याची जाणीव झाली असून सावध भूमिका घेत शिंदे गटाला 17 जागा निश्चित केल्याची चर्चा आहे. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असलेल्या मुंबईतील 36 जागांपैकी 25 जागा ठाकरे गट लढवण्याच्या तयारीत आहे.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे मुंबईतील जास्तच जास्त जागा लढवाव्यात अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलीय. दरम्यान ठाकरे गटाकडून कोणत्या 25 जागांवर लढण्याची तयारी सुरुय. त्यावर एक नजर टाकुयात. १)शिवडी २)भायखळा ३)वरळी ४)माहीम ५)चेंबूर ६)भांडुप पश्चिम ७)विक्रोळी ८)मागाठाणे ९)जोगेश्वरी पूर्व १०)दिंडोशी ११)अंधेरी पूर्व १२) कुर्ला १३) कलिना १४)दहिसर १५)गोरेगाव १६)वर्सोवा १७)वांद्रे पूर्व १८)विलेपार्ले १९)कुलाबा २०)वडाळा २१) चांदीवली २२)बोरिवली २३)मलबार हील २४) अनुशक्ती नगर २५) मानखुर्द शिवाजीनगर

2019 विधानसभा बलाबल:-

2019 विधानसभेचा विचार केल्यास केलास शिवसेनेनं मुंबईत चांगली कामगिरी करत 14 जागांवर विजय संपादन केला. मुंबईत 2019च्या विधानसभेत युतीत असताना 36 पैकी शिवसेनेनं 19 जागा लढवल्या त्यातील 14 जागांवर सेनेनं विजय मिळवला. त्यातील 8 आमदार ठाकरेंकडे आहेत. तर 6 आमदार शिंदे गटात आहेत. दरम्यान भाजपनेही 17 जागा लढवल्या होत्या (भाजपा ९९% स्ट्राईक) ने त्यातील 16 जागांवर भाजपनं विजय मिळवला. तर उर्वरित 6 जागांवर काँग्रेसनं 4 जागा, राष्ट्रवादीनं 1 आणि समाजवादी पार्टीनं 1 जागा जिंकली होती. तर मानखुर्द-शिवाजीनगर, अनुशक्तीनगर, बांद्रा पूर्व, धारावी आणि मुंबादेवी या 5 विधानसभेच्या जागांवर ठाकरे गटाचा पराभव झाला होता.

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण

मुंबईत शिवसेनेची मोठी ताकद आहे. एक संघटना म्हणून शिवसेना मुंबईत तळागळापर्यंत पोहोचलीय. मात्र, शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत गेलेत. एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत आमदारांची एक मोठी फळी देखील नेली. ठाणे आणि मुंबईत एकनाथ शिंदेंनी ग्राऊंड लेव्हलवर केलेल्या कामामुळे ठाकरे गटाची मुंबईतील ताकद कमी होणार अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की मुंबई हा ठाकरेंचाच बालेकिल्ला आहे.

ठाकरे गटानं लोकसभेत 4 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 3 जागा त्यांनी जिंकल्यात तर उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर केवळ 48 मतांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांचा पराभव झाला. मुंबई हा ठाकरे गटाचा गड आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं भाजप आणि शिंदे गटाला जोरदार टक्कर देत. मुंबईत आपला झेंडा फडकवला. त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभेत मुंबईतील 36 जागांपैकी 25 जागा लढवण्याची ठाकरे गटाची तयारी आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत