मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे यांची भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण लागू करावं अशी मागणी मनोज जरांगे हे सातत्याने करत आहे. त्यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत. याचविषयी आज (18 जुलै) माध्यमांशी बोलत होते. त्याचवेळी प्रसाद लाड यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेबाबत जेव्हा जरांगेंना विचारण्यात आलं तेव्हा ते प्रचंड संतापले.
प्रसाद लाड यांनी असं म्हटलं होतं की, ‘मनोज यांना DD नावाचा रोग झालाय. डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी..’ त्यांच्या याच टीकेला उत्तर देताना मनोज जरांगेंचा तोल सुटला आणि त्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रसाद लाड यांना अपशब्द वापरले. पाहा मनोज जरांगे नेमकं काय-काय म्हणाले..
मनोज जरांगेंची भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर जहरी टीका
हे कोण आहे आता बांडगूळ.. कुठपर्यंत थुका चाटतो लोकांच्या बांडगुळ्या.. तू किती पैसेवाला आहेस आणि तू किती भ्रष्टाचारी आहेस.. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा.. अख्खी राख लागेल.. तुला गोवऱ्या सुद्धा खाता यायच्या नाही शेणाने थापलेल्या. मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तुझं घर मोठं करणारी औलाद आहे तू.. माझ्या नादी लागू नको. तू तुझ्या औकातीत राहा.. देवेंद्र फडणवीसाचे पाय चाट नाही तर त्याचा #$ खा… माझ्या नादी लागू नको. मी तुझं केव्हा नाव घेतलं का? तू लाड कोण आहे आणि कोण आहे..
उलट तुम्ही भूषण होता आमच्या जातीचे.. मोठे लोकं आहात म्हणून.. पण तुम्ही नीच, नालायक निघालात.. तुला महागात पडेल ते.. असे झिंगूर-झांगूर खूप येतात आणि जातात. तू तुझ्या औकातीत राहा.. मी तुला बोललो नाही तुझ्या कुटुंबावर बोललो नाही.. कारण मला तुमचा आधार आहे, मराठ्यांच्या मोठ्या नेत्यांचा…
पण तू जर म्हणाला रोग झालाय.. डीडी झाला.. काय %$ झाला.. हे सांगत जाऊ नको.. तू देवेंद्र फडणवीससोबत मंत्री हो.. मोठा हो.. आमदार हो.. तुला शुभेच्छा आहेत आमच्या.. तू त्याचा रोज #$ खा… तरी शुभेच्छा आहेत आमच्या तुला.. आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नको. कारण आमच्या लेकरांचं वाटोळं झालंय. तुला एवढा राग येतो ना.. कोण आहे तो हरा&$@, बांडगूळ.. ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का? त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरती 400 ते 500 पोरं आहेत. त्यांना ठाण्याच्या एसपीने कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढलं आणि ओपनमध्ये टाकलंय.
तुला जर मराठ्याची काय आस्था असेल ना.. ते देवेंद्र फडणवीसनं का केलं ते विचार त्याला.. माकडा.. कुठेही शेण खातो आणि कुठंही बोलतो. त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटतो का त्याची थुका.. भंगार सगळ्या दुनियाचा तू.. माझ्या पोराचं वाटोळं झालंय.. तुला काय होतंय. हा पोरगा इथे आलाय.. लाड्या असं असतं माझ्याकडे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल.. तुझ्यासारखे थुका चाटीत नाही देवेंद्र फडणवीसांचे.. बघ हा ठाण्यावरून आलाय.. ए लाड्या.. गचपाण्या.. मराठ्याचं $% कुठवर खातो आणि मोठा होतो.
हे बघ.. हा मुलगा आहे.. त्याचं नाव आहे सखाराम ढोणे.. जिंतूरचा आहे हा.. हा पोलीस भरतीत आहे, बरोबर का.. ठाण्याला याचा नंबर लागलाय. त्याच्याकडे हे कुणबी प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र घेत नाही.. तो तुझा देवेंद्र फडणवीसचा एसपी काय बोलतो.. चारशे पोरं आहेत असे मराठ्यांचे.. ओपनमध्ये जा.. नाही तर रिजेक्ट करतो तुला..
मारतो का 400 पोरं.. ए देवेंद्र फडणवीसची बाजू उचलणाऱ्या.. दलिंदर दुनियाचा सगळा तू.. माकडा माझा जातीसाठी जीव तळतळतोय.. तुझा देवेंद्र फडणवीसला मोठा करण्यासाठी जीव तळतळतोय.. कशाला तळतळाट घेतोय भंगार..
त्या देवेंद्र फडणवीसला बघ ना.. पँट, शर्ट काढून.. त्याला कोणता रोग झालाय. मारतोय काय माझी मराठ्याची पोरं.. मराठे परवडायचे नाही तुला.. कोण लाड आहे गोड आहे.. मी स्वाभिमानी आहे म्हणून असा कचाकच बोलतोय. मला जात मोठी करायची आहे.. झालं त्या पोराचं वाटोळं. कशाला दिलं रे ईसीबीसीतून 10 टक्के आरक्षण?
लाव ती पोरं.. घे ईसीबीसीतून.. तुला सगळे बोललेले शब्द मागे घेतो मी. घे ती पोरं.. 400 पोरं आहे ती.. त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत. ईसीबीसीतून, ईडब्ल्यूमधून फॉर्म भरलेले आहेत.
कशाला प्रमाणपत्र दिले आहेत तुझ्या देवेंद्र फडणवीस आणि सरकारने आम्हाला.. प्रमाणपत्र नसणाऱ्यांना आत घेता. भंगार IAS दर्जाचे अधिकारी झालेत. आणि आमच्याकडे ओरिजनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला लागलात. कोण आहे रे तू.. तुझ्या तोंडावर #% म्हटलं तरी एकही मराठा ^#% नाही.. तुझं थोबाडच बघत नाही आम्ही. तो कशाला थुका चाटतोय रे बळंच..
तुला खूप प्रेम आहे ना.. तर देवेंद्र फडणवीससोबत लग्न कर.. इथे माझ्या मराठ्याला त्रास देऊ नको उगाचच.. मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर तेव्हा बोल..
लाड्या गचपाण्या कुठून आलाय तू.. तू मराठ्यासंगं खेटू नको.. पैशाची मस्ती असेन.. पैसे वैगरे पुरत नसतात मराठ्यांपुढे.. शहाणा होय.. देवेंद्र फडणवीसने ही चाल सुरू केली काय आता… देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्याचे लोकं अंगावर घालू नका आमदारं.. तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार आणि मंत्री आमच्या अंगावर घालू नका.
तुम्ही मराठा-मराठ्यात मारामारी लावू नका फडणवीस साहेब.. तुम्हाला गोडीत सांगतोय मी.. तुम्हाला जाहीर सांगतोय. मराठे आता मारामाऱ्या करणार नाहीत. तुमच्याकडे निघतील बरं काय.. तुम्हाला मी खरं सांगतोय.. तुम्ही मराठ्यांच्या जीवावर मोठे झालात. तुम्ही मजा बघू नका हा.. आमच्या मारामाऱ्या लागलेल्या.. मराठे जर खवळले ना तर गय करणार नाहीत. अशा शब्दात मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे.