मोठी बातमी! पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं अटक

0

राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत. मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती आहे.

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलं आहे. महाड मधून पूजा खेडकरच्या आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचे तीन पथक त्या ठिकाणी शोध घेत होते. पूजा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर असल्याची पाहणी केली होती. त्यावेळी तिने पोलिसांना दाद दिली नव्हती. नंतर घराच्या गेटवरती कुलूप लावल्याचं निर्दशनास आलं होतं. फोन देखील बंद असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांची ३ पथकं मनोरमा खेडकरसह इतरांचा शोध घेत होते. आज अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकरला अटक केलं आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकरचा शोध पोलिसांकडून सुरू होता. खेडकरांच्या घराबाहेर नोटिस देखील लावण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक मनोरमा खेडकरला घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झालं आहे. महाडमधील एका हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांचं पथक हॉटेलवरती दाखल झालं त्यानंतर मनरमा खेडकरला अटक करण्यात आली आहे.

मुळशीतील व्हायरल व्हिडीओनंतर पूजा खेडकरांच्या आईवर गुन्हा दाखल

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरवर पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं होतं. खेडकर कुटुंबाकडून कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलिस निघून गेले होते. मनोरमा खेडकरने बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरसह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलिस यासंदर्भात मनोरमा खेडकरची चौकशी करण्यासाठी आले होते. पण त्यांच्या घरी कुणीही नसल्याने पोलिस परत गेले. त्यानंतर मनोरमा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर आली होती. आज तिला महाडमधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी मनोरमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी घराला कुलूप असल्याने फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण फोनही लागत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. तसेच खेडकर कुटुंबाच्या पुणे आणि आजूबाजूला असणाऱ्या फार्म हाऊसवर देखील पुणे पोलिसांनी शोध घेतला होता.