“स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२४ व सफाई अपनाओ बीमारी भगाओ” या जनजागृती अभिनयान्वये कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय ,घनकचरा व्यवस्थापन, सिटी इंटरनॅशल स्कूल व सरस्वती माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेविषयी जनजागृती अभियान प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, गणेश सोनुणे, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रकाश मोहिते यांच्या मार्गदर्शना खाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी तसेच बालवाडी ते ४ थी मधील असे एकूण तीन हजार हजार विद्यार्थी विद्यार्थीनी प्रचार फेरी जनजागृती अभियानात सहभागी झाले होते. सदर प्रचार फेरी डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण, गाढवे कॉलनी, एकलव्य कॉलेज परिसरात काढण्यात आली. या जनजागृती व ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या प्रचार फेरी मध्ये शाळेतील शिक्षकवृंद, पालक व कोथरूड प्रभाग क्रमांक १० व १२ या भागातील नागरिक, “स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, हरित पुणे, कचरामुक्त पुणे, बीमारी मुक्त पुणे”, ओला व सुका कचरा कचरा वर्गीकरण करा, रिकाम्या जागेत, नदी नाल्यात व सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकू नका आपले पुणे शहर स्वच्छ ठेवा, पाण्याचा जपून वापर करा, प्लॅस्टिकचा वापर टाळा कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करा, ओला कचरा सेंद्रिय व गांडूळ खत प्रकल्पाद्वारे आपल्या परिसरात जिरवा, रेनवॉटर हार्वेस्टींग व सोलर सिस्टीम राबवा विजेची बचत करा, अशा प्रकारे स्वच्छते विषयीच्या घोषणा देण्यात आल्या. स्वच्छता प्रचार फेरी व ज्ञानेश्वर महाराज पालखी सांगता सोहळा समारंभात वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे व आरोग्य निरिक्षक करण कुंभार, गणेश साठे, सचिन लोहकरे, लक्ष्मीकांत कुलकर्णी व कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे ब्रँन्ड अँम्बेसिडर मोकादम वैजीनाथ गायकवाड यांनी पावसाळ्यात पसरणाऱ्या, झिका, डेंग्यू, मलेरिया, हिवताप, घटसर्प, सर्दी, खोकला इत्यादींचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच हात स्वच्छ धुवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती व यापासून बचाव करण्यासाठी आपण स्वच्छता पाळावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
मोकादम विजय पाटील, साईनाथ तेलंगी, आण्णा ढावरे, गणेश चव्हाणअशोक कांबळे, उत्तम मोरे रोहित, जाधव यांनी पुढाकार घेतला. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मजा चावली, अनुराधा पाध्ये, धिरज कोळेकर, सविता सराफ, सरस्वती शाळेच्या उज्वला ढेरे, कैलास सरतापे व सर्व शिक्षकवृंद, पालक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले.