विजयी टीम इंडियाला घेऊन आलेल्या विमानाचही रेकॉर्ड; बार्बाडोस ते नवी दिल्ली एवढ्यांच ‘ट्रॅक’ अभिमानास्पदच!

0

20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला बार्बाडोसहून भारतात आणण्यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. टीम भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री बार्बाडोसहून निघाली आणि गुरुवारी पहाटे राजधानी दिल्लीत दाखल झाली. आता भारतीय टीम ज्या फ्लाईटनं मायदेशी परतली तिनं एक नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे!

या फ्लाईटचं नाव ‘AIC24WC’ असं होतं. विमानांना लाईव्ह ट्रॅक करणाऱ्या रेडार 24 या कंपनीनं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, बार्बाडोसहून भारतात येणाऱ्या या फ्लाईटला सर्वात जास्त लोक ट्रॅक करत होते. भारतीय चाहत्यांना टीम इंडिया मायदेशी कधी परतते याची खूप उत्सुकता लागली होती. त्यामुळे चाहते सतत या फ्लाईटला ट्रॅक करत होते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

फ्लाईट रडार कंपनीनं सोशल मीडियावर सांगितलं, “सध्या भारतीय संघ ज्या फ्लाईटमध्ये आहे, त्या फ्लाईटला सर्वाधिक लोकं ट्रॅक करत आहेत. जेव्हा कंपनीनं डेटा शेअर केला, तेव्हा एकूण 5,252 लोकं एयर इंडियाच्या या चार्टर फ्लाईटला ट्रॅक करत होते. ही संख्या सातत्यानं वाढत होती.

भारतीय टीम गुरुवारी पहाटे दिल्ली विमानतळावर दाखल झाली. त्यानंतर सुमारे 12 वाजताच्या सुमारास संघानं पंतप्रधान नरेंद्री मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर संघ मुंबईसाठी रवाना झाला. मुंबईत सायंकाळी विजयी परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. ही विजय परेड नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी असेल. 2007 मध्ये जेव्हा भारतीय संघानं पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता, तेव्हा अशा परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. आता तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा अशी परेड पाहायला मिळणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा