भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सफाईकर्मचा-यांचा सन्मान

0

आज १४/०४/२०२३ १३२ व्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उजवी भुसारी कॉलनी मधील सर्व आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार व अल्पोपहाराचा कार्यक्रम मनसे , सावरकर प्रमाण शाखा व संकल्प सिद्धी हनुमान मंदिर यांच्या वतीने मिठाई देऊन सत्कार केला या वेळी माजी प्राचार्य श्री सुरेश देशपांडे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करून दिली या वेळी प्यारेलाल चौधरी, निलेश सैंदाणे,पवन कनोजिया, सुहास बटुले , मुरलीधर मानकर,कपील साळुंके यांनी सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन
प्रशांत कनोजिया प्रमुख राज्य संघटक, मनविसे,महाराष्ट्र यांनी केले होते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा