भाजपकडे विधान परिषद 5 जागा नावे केंद्रीय समितीकडे; पुण्याच्या ‘या’ 2 नावामुळे महायुती एकत्र लढण्याचे संकेत

0

राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. यावेळी महायुतीतून भाजपच्या वाट्याला 5 जागा येणार आहेत. या पाच जागांवर कोणाला संधी द्यायची यासाठी महाराष्ट्र भाजपने 10 नावे केंद्रीय समितीकडे पाठवली आहे. महाराष्ट्र भाजपने पाठवलेल्या या 10 नावांमध्ये इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील योगेश टिळेकर यांच्या नावाचाही समावेश आहे. जर विधान परिषदेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे नाव भाजपच्या केंद्रीय समितीने मान्य केले तर हर्षवर्धन पाटील योगेश टिळेकर यांची यावेळी विधानसभा निवडणूक लढण्याची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही नुकतेच महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदार दत्ता भरणे यांना इंदापूरातून विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत बारामतीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मदत करण्याच्या आधी अजित पवार यांनी विधानसभेबाबत भूमिका स्पष्ट करण्याची उट ठेवली होती. त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर मध्यस्थी केल्यानंतर पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता.

विधान परिषदेसाठी भाजपने कोणाची नावे पाठवली ? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी 10 नावे केंद्राकडे पाठवण्यात आले आहे. यातील 5 नावांवर आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहेत. बावनकुळे यांनी पाठवलेल्या नावांमध्ये पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ आणि माधवी नाईक यांचा समावेश आहे..

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती