‘……कोथरूड!’ हा शब्द उच्चारला तरी विरोधकांना धस्स वाटतं! आणि भारतीय जनता पक्षात इच्छुकांच्या उड्या पडतात कारणही तशीच कारण या मतदारसंघाला भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजले जाते. हा मतदारसंघ मिळवण्यासाठी लोकांच्या उड्या पडतात माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनाही संपूर्ण महाराष्ट्रात एक सुरक्षित जागा ‘ही सुद्धा’ कोथरूडचीच वाटली. लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूक कोणतीही असो तसे निकालही या मतदारसंघामध्ये मिळतात आणि त्यामुळेच असंख्य ‘इच्छुकांचा संच’च या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतो यामध्ये काही बाहेरून आलेले तर काही कायम अपेक्षेच्या निष्ठेने काम करणारे! भारतीय जनता पक्ष यांच्या व्यतिरिक्त कोणी यामध्ये ‘दंड’थोपटले तर ते आश्चर्यकारक वाटतं. पण याच कोथरूड बालेकिल्लाला छेद देत परिवर्तन करण्याचा ‘हॅट्रिक’ नगरसेवक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव रामचंद्र उर्फ चंदुशेठ कदम यांनी दृढसंकल्प केला असून आत्ता चंदुशेठ कदम यांना आमदार व्हायंचय तेही ‘कोथरुड’चंच!
कोथरूड विधानसभा मतदारसंघात यंदा मविआच्या एकीमुळे काँग्रेसच मुसंडी मारणार असल्याचा ठाम विश्वास माजी नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांना आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात ‘इंडिया फ्रंट’चा प्रचार एकजुटीने सुरु आहे. कोथरूडमधून स्व. बापट मिळालेलं 1 लाख 6 हजार १९६ मतांचे मताधिक्य स्थानिक उमेदवार (केंद्रीय राज्यमंत्री) असतानाही फक्तं 73 हजारांचे मताधिक्य. ….आणि हाच शुभसंकेत आहे परिवर्तनाचा! बापटांना सर्वाधिक मताधिक्य पण विधानसभेत विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना (एक संघ शिवसेना सोबत असतानाही) २५ हजार ४९५चे मताधिक्य मिळाले. हाच फरक महत्वाचा आहे. राज्यातील सत्तेचा विचित्र प्रयोग हा मतदारांच्या पचनी पडलेला नाही यंदा कोथरूड विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने या मतदारसंघात मुसंडी मारण्याचा संकल्प निश्चित केला आहे. भाजपच्या ‘फोडाफोडी’च्या राजकारणामुळे मतदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. मोदी लाट प्रभावहीन ठरेली आहे. पुणे महापालिका काँग्रेस नगरसेवक म्हणून गेली 15 वर्षे नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक केलेली आहे. कोथरूड मतदारसंघात आम्ही प्रभाग निहाय नियोजनपूर्वक कामे सूरू झाली आहेत. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहोत. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट होत असलेल्या प्रत्येक प्रभागामध्ये एक आश्वासक चेहरा आज मविआकडे असून त्यांनी केलेलं काम मतदारांनी पाहिलेला त्यामुळे त्यांच्या मनाला मतदार पाठिंबा देण्याची शक्यता आहे. वस्ती भागात आम्ही आजवर केलेली कामे हीच जमेची ठरणार आहे. कोथरूडचा बालेकिल्ला सर करण्यासाठी एक सूक्ष्म नियोजन केले जात असून सुमारे (50 सर्वपक्षीय) सक्रिय कार्यकर्त्यांची फौजही यासाठी कामी येईल असेही चंदूशेठ कदम यांनी सांगितले.