पुणे विधानसभा जागावाटप ‘ठिणगी’? महायुतीत 0 जागा तरी माविआत ‘त्या’ 5 जागा ठाकरेंच्या सेनेला हव्यात!

0

राज्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच विधानसभेचेही पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेत चांगल यश मिळाल्यानंतर मविआमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असून विधानसभेतही आपणच बाजी मारू असा विश्वास आहे. परंतु महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये अनैसर्गिक सदस्य सहभागी झाल्यामुळे कदाचित जागा वाटपामध्ये मोठी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या तरी काँग्रेसच्या वतीने सर्वाधिक जागा जिंकल्या असतानाही विधानसभा जागेवरती काही बोलले जात नाही पण राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वतीने मात्र आपापसात कुरबुड्यांना सुरुवात झाली आहे. महायुतीमध्ये सलग 10 वर्ष एकही जागा न लढवलेल्या शिवसेनेला आता पुणे शहरात पाच ठिकाणी आपले नशीब आजमवण्याची इच्छा आहे तर दोन्ही विद्यमान आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेलेले असतानाही शरद पवार गटांनीही पुणे शहरावरती विशेष केंद्रलक्षित केल्यामुळे पुणे शहर जागा वाटप चर्चेत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी तिन्ही पक्षातील नेते आग्रही असून विविध जागांवरती आपला दावा सादर करत आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडून आघाडीची बिघाडी होण्याची शक्यताही आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून 6 विधानसभा जागांवर दावा करण्यात आला आहे. यामध्ये हडपसर, पर्वती, वडगाव शेरी, खडकवासलासह शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट मतदार संघाचा समावेश आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटकडून देखील कोथरुड, पर्वती, हडपसर वडगाव शेरी, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट या सहा मतदारसंघांवर दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईमध्ये पुण्यातील विधानसभानिहाय पदाधिकाऱ्याची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडली. पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी कोथरूड, हडपसर वडगावशेरी, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या पाच जागांची मागणी आम्ही केली आहे. या बैठकीला सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, रवींद्र मिर्लेकर हे नेते उपस्थित होते. पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या सादर अहवालाच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ताकद आहे. तसेच मविआमध्ये ह्या जागा मिळाल्यास कशा जिंकून आणू शकतो याबाबत वरिष्ठांना माहिती दिली आहे. कसबा पोटनिवडणुक शिवसेना ठाकरेगटाच्या ताकदीवरच विजयी झाल्यामुळे या जागेसाठी देखील शिवसेना ठाकरेगट आग्रही असून एकूण 6 जागांची मागणी करण्यात आली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

लोकसभा निवडणूक, सध्याची शिवसेना ठाकरेगटाची ताकद आणि यापूर्वी शिवसेनेचा त्या जागेवरचा विजय या बेसिसवर जागांची मागणी आम्ही केली असल्याचं शहराध्यक्षांनी सांगितले. मागील 2 विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये स्वतंत्र निवडणुका झालेल्या भारतीय जनता पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढल्या अन् जिंकल्याही होत्या पण त्यानंतर 2019मध्ये महायुतीचा ‘युतीधर्म’ म्हणून पुण्यातील एकही जागा आम्ही लढली नव्हती. मात्र आता पुण्यात शिवसेनेची ताकद दाखवून देण्याची संधी आहे. त्यामुळेच ज्या जागांवर आमची ताकद त्याच जागांची मागणी आम्ही केली असल्याचं शहराध्यक्षांचे म्हणणे आहे.