मविआत काही वेगळंच घडतंय? ठाकरेंची ‘स्वबळा’ची तयारी? शिवसेना भवनात रोज बैठका सैनिकांना या सूचना

0
1

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला. लोकसभेनंतर आता राज्यसभेतही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून एकत्र निवडणूक लढवली जाईल, असं सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे आपल्याला किती जागा हव्यात, याबाबत मविआतल्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन बोलणी फिस्कटली तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतात. पण ते आघाडीसाठी थोडं घातक ठरु शकतं. अर्थात याबाबत काय-काय घडामोडी घडतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे चांगलेच कामाला लागले आहेत. ठाकरेंकडून शिवसेना भवन येथे दररोज बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंनी आज राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना अतिशय महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे प्रत्येक मतदारसंघांचा थेट A टू Z माहितीचा अहवाल मागवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता विधानसभेत तयारीनीश उतरण्याच्या तयारीत आहेत हे स्पष्ट होत आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

लोकसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. लोकसभेच्या निकालावरून आपण मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढली तर काय होईल? याचा अहवाल मागितला. विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का? असल्यास उमेदवार कोण असावा? तसेच संभाव्य विजयाचे समीकरण कसं असेल? याबाबत ठाकरेंनी अहवाल मागितला आहे. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये स्वतःच्या उमेदवाराचे तसेच मित्रपक्षांच्या उमेदवाराचे, पदाधिकारी यांनी काम केलं की नाही? याबाबतचा अहवाल मागितला आहे.

विधानसभा संपर्कप्रमुख अहवाल कसा बनवणार?

१. लोकसभा निवडणूक २०२४ चे विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

२. यादीप्रमाणे पूर्ण बुथप्रमुख होते का? न होण्याची कारणे, असल्यास कार्यरत होते का?

३. शिवसेना उमेदवाराचे काम महाविकास आघाडीमधील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले का?

४. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले का?

५. सदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेस अनुकूल आहे का? असल्यास संभाव्य उमेदवार कोण असावा?

६. संभाव्य विजयाचे समिकरण कसे असेल?

७. फक्त शिवसेना लढली तर काय होईल?

८. मतदारसंघ शिवसेनेस अनुकुल नसल्यास, आघाडीत कोणत्या पक्षास द्यावा, उमेदवार कोण असू शकतो?

९. बिएलए एजंटचे निवडणूक कार्यालयात रजिस्ट्रेशन झाले आहे का? निवडणूक आयोगाची ओळखपत्रे आपल्याकडे आहेत का? नसल्यास त्वरित करुन घ्यावे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

१०. लोकसभा निवडणूक २०२४ आपला अभिप्राय थोडक्यात ?