आत्ता जरांगेंच आंदोलन दुर्लक्षित राहणारं?; मराठ्यांना सर्वकाही देऊनही मतं विरोधकांच्या पारड्यात: फडणवीस

0

लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये राज्यात भाजपला मोठा धक्का बसला. यामुळे राज्यात महायुतीला आलेल्या अपयशाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मोकळं करुन काम करायची संधी द्या, असे सांगितले. यामुळे याची बरीच चर्चा रंगली. असे असले तरी त्यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नाही. त्यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली मात्र निर्णय झाला नाही. आज मुंबईत भाजपची बैठक पार पडली, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तीन नव्हे तर आणखी एका चौथ्या पक्षामुळे महायुतीचा पराभव झाला, असे सांगितले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत महायुतीच्या पराभवाची कारणं सांगितली. याबाबत फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेली मतं ४३.९ टक्के आहेत आणि महायुतीला मिळालेली मतं ४३.६ टक्के आहेत.

यामुळे यामध्ये पॉईंट थ्री पर्सेट इतकी मतांमधली गॅप आहे. असे असले तरी तिकडे ३१ आणि इकडे १७ जागा आहेत. आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो तर आपण चौथ्या पक्षाशीदेखील लढत होतो, तो पक्ष होता खोटा नरेटिव्ह. आपल्याला वाटलं की, या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल.

असे असताना आपल्या हे लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरीता काम करत आहे, त्याला आपण रोखू शकलो नाहीत. आपली लढाई ही त्यांनी तयार केलेल्या नॅरेटिव्हविरोधात होती. संविधान बदलणार, हा विषय इतका खालपर्यंत गेला. पण त्या मानाने आपण त्या प्रचाराला इफेक्टिव्हली काऊंटर करु शकलो नाही.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा चौथा टप्पा आला होता. त्यामुळे पहिल्या तीन टप्प्यात २४ जागांपैकी केवळ चार जागा आपण जिंकू शकलो. तसेच मराठ्यांना सर्वकाही देऊनही मतं विरोधकांच्या पारड्यात गेली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.