शहरात पाणी तुंबल्यानंतर प्रशासनाच्या विरोधात राजकीय पक्षांकडून भूमिका घेत त्यांच्या निष्क्रीयणावर टीका केली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी भाजप, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पाणी तुंबण्यावर उपाय योजना करा, आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय करा, निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, वर्षा तापकीर, राहुल भांडते, सुशील मेंगडे, बापू मानकर, दीपक पवार आदी उपस्थित होते.






पत्रकार परिषदेत घाटे म्हणाले, “शहरात पहिल्याच पावसात नाले सफाई व्यवस्थित झाली नसल्याचे समोर आले. क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी मदत पोचविण्यास दिरंगाई करत आहेत, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना शहराची माहिती नाही, समजून घेण्याची तयारीही नाही, त्यामुळे अशा निष्क्रीय अधिका-यांचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यांच्या कामात सुधारणा होणार नसेल तर त्यांना परत राज्य शासनाकडे पाठवावे. शहरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे. वारकन्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने तयारी करावी, अशी मागणी केल्याचे चाटे यांनी सांगितले,
शिवेसनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनीही नाले सफाई, पावसाळी गटारांची स्वच्छतेची न झालेली कामे आप्णि शहरात पाणी तुंबल्याने आयुक्तांना निवेदन दिले. मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. त्यांना आपत्तीच्या वेळी मदत मिळालेली नाही. त्यामुळे त्वरित महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी भानगिरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेविका अश्विनी कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपवर टीका केली. गेल्या अनेक वर्षांपासून पर्वती मतदारसंघात आंबिल ओढवाच्या शेजारी असणाऱ्या रहिवाशांना पुराचा धोका आहे. पाष्ण त्यात सत्ताधायऱ्यांना सुधारणा केलेली नाही. विधानसभा निवडणूक आल्यानंतर त्यांना प्रश्नांची आठवण झाली आहे. इतके वर्ष आमदार असताना कामे करून का घेता आली नाहीत, त्यांनी आता प्रशासनाला जाब विचारण्यापेक्षा त्यांनी कामे करून घेणे आवश्यक होते, अशी टीका कदम यांनी आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर केली. यावेळी नितीन कदम उपस्थित होते.












