पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळांना पंतप्रधान मोदींच्या टीममध्ये सहभागी करून घेण्यात आले. पुणे हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने एका निष्ठावान कार्यकर्त्याला राज्यमंत्रीपदाची संधी देऊन शरद पवार यांच्यावरती पलटवार करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेला हा डाव सुप्रिया सुळे यांच्या खूप जिव्हारी लागला आहे की काय? प्रतिक्रिया देताना पुण्याचा मंत्रिपदाचा २८ वर्षांचा दुष्काळ संपल्याची भावना व्यक्त होत आहे. आता मंत्रिपद मिळाल्याने बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मोहोळ यांना हिंजवडी आयटी पार्कची जाणीव करून देत खोचक प्रश्न केला. त्यावर चारवेळा खासदार झालेल्या सुळेंना नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे.
पुण्याचे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मोहोळ यांना लक्ष्य केले आहे. हिंजवडीमधील 35 ते 40 आयटी कंपन्या पुण्याच्या बाहेर जात आहेत. आता पुण्याला मंत्रिपद मिळाले आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता, पुणेकरांना व्हावा, एवढीच अपेक्षा आहे, असा टोला खासदार सुळेनी मंत्री मोहोळांना नाव न घेता लगावला.
या टीकेला मंत्री मोहोळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुळेचे Supriya Sule आभार मानत सडेतोड उत्तर दिले आहे. सुप्रियाताई, शुभेच्छांबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे. पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं, असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडले.
https://x.com/mohol_murlidhar/status/1800106487915962824?t=mS9kz2ZGsJ1apifYZinWuQ&s=19
पुण्याचे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली, यावर राष्ट्रवादी कीग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मोहोळ यांना लक्ष्य केले आहे. हिंजवडीमधील 35 ते 40 आयटी कंपन्या पुण्याच्या बाहेर जात आहेत, आता पुण्याला मंत्रिपद मिळाले आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता, पुणेकरांना व्हावा, एवढीच अपेक्षा आहे, असा टोला खासदार सुळेंनी मंत्री मोहोळांना नाव न घेता लगावला.
या टीकेला मंत्री मोहोळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुळेचे आभार मानत सडेतोड उत्तर दिले आहे. सुप्रियाताई, शुभेच्छांबद्दल आपले मनापूर्वक धन्यवाद। खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे. पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडले.
ताई, आपली ‘मळमळ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो. आता उरला प्रन्न ठेकदारांचा. तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करून स्वताचं हसं सोडून दुसरं काहीं होणार नाही. अशी टीका मोहोळ यांनी केली आहे.