निकालापूर्वीच युतीतील टोकाचा वाद; भाजप कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

0

उद्या देशभरात लोकसभेच्या निकाल लागणार आहे. सगळ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. तर महायुतीतील मित्रपक्ष मिळून निकालाचा आनंद साजरा करतील यात शंका नाही. परंतु, निकालापूर्वीच युतीतील टोकाचा वाद आला आहे. उल्हासनगरमध्ये महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिंदे गट आणि भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. विकासकामाच्या श्रेय वादातून झालेल्या या भांडणात भाजपच्या कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.

यावेळी शिंदे गटाचे माजी युवा पदाधिकारी सोनू चांनपुर यांच्याकडे काम करत असलेल्या निलेश सरोजा यांनी संतोष तांबेकर यांना फ्री स्टाईल बेदम मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर संतोष तांबेकर यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

तर निलेश सरोजा यांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवार सायंकाळची असून याप्रकरणी तांबेकर यांची प्रतिक्रिया भेटली नसली तरी शिंदे गटाचे युवा सेना माजी पदाधिकारी सोनू चांनपुर यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निकालाच्या धामधुमीच्या काळात शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भांडणाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.