कायद्यातून पळवाट काढण्यात व्यावसायिक तरबेज सर्रास पबचा व्यवसाय; पोलिसच राखणदार…’ ही मोठी खंत

0

पूर्व भागात असलेल्या आयटी कंपन्या आणि उच्चभू महाविद्यालयांतील विद्यार्थी समोर ठेवून व्यावसायिकांनी व्यवसाय खराडीमध्ये वाढवले आहेत. याभागात सुमारे ७० पब असल्याचे समोर आले आहे. ‘ॲटमॉस्फियर म्युझिक’ असा गोंडस शब्द वापरून सर्रास पबचा व्यवसाय केला जातो. व्यवसायाची जागा, हद्द, खाद्यपदार्थांचा परवाना, दारू विकण्याचा परवाना, बंद जागेमध्ये सुरू असलेले संगीत, खुल्या जागेतील संगीत अशा विविध तांत्रिक बाबी पुढे करून कायद्यातून पळवाट काढण्यात व्यावसायिक तरबेज झाले आहेत. पब, दारू, हक्का, गांजा, ड्रग्ज खुलेआम उपलब्ध असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे.

पहाटे तीनपर्यंत, तर कधी-कधी अगदी सकाळी सहापर्यंत हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते. पब संस्कृतीमुळे नगर रस्ता परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी विमाननगर, येरवडा, कल्याणीनगर, चंदननगरमधील नागरिकांनी पोलिसांकड़े तक्रारी केल्या, बैठका घेतल्या परंतु समस्या सुटली नाही.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पोलिसच राखणदार…’

नगर रस्ता परिसरात फोफावलेल्या पब संस्कृतीबाबत नागरिकांनी पोलिसांवर बेट आरोप केले आहेत. अनेक ठिकाणी पोलिसच चालकांचे राखण करतात; तर काही ठिकाणी पोलिसच पार्टनर असल्यामुळे अवैद्य धंदे बंद कसे होणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. खराडीमध्ये एका उच्चभ्रू टॉवरमध्ये पहाटेपर्यंत पच सुरू असल्यामुळे परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. खराडीत एका ठिकाणी अशा रेस्टॉरंट आणि बारला एक पोलिस अधिकारीच पार्टनर असल्याची माहिती समजली. मुंढव्यातील काही पबवर राजकीय वरदहस्त आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पब, रेस्टॉरंट, बारची संख्या :-

खराडी : १३

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

विमाननगर : १९

मुंढवा कोरेगाव पार्क: २६

कल्याणीनगर व येरवडा: ११