बारावीचा एकूण निकाल ९३.३७%; यंदाही मुलींचीच बाजी  यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ 

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.

या निकालात यंदा ही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये पार पडल्या. महाराष्ट्रातून यंदा बारावीची परीक्षा तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. यंदा बारावीचा एकूण निकाल ९३.३७% लागला. यंदा मुलांपेक्षा 3.८४ टक्क्यांनी मुलींची टक्केवारी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन