लोकसभा निवडणूक संपताच चक्रे फिरली?; अजामीनपात्र अटक वॉरंट खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ

0
1

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पुर्वीच पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. सदनिका बुक केल्यानंतर कंपनीने ना करार केला, ना बांधकाम सुरू केले.त्यामुळे बुकिंगसाठी दिलेली रक्कम नऊ टक्के व्याजासह परत करावा. असा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला होता. या आदेशाची पुर्तता न केल्याप्रकरणी काकडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

पुण्यातील कोथरूड भागात असलेल्या अनघा आंबेडकर यांनी याबाबत काकडे कन्स्ट्रक्सन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर याचा निकाल राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष राम सुरत राम मौर्य आणि सदस्य भरतकुमार पांडे यांनी हा निकाल दिला आहे. त्यामुळे संजय काकडे यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

संजय काकडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने कोथरूड बाग या गृहप्रकल्पात २०१५ मध्ये निवासी सदनिका बुक केली होती. ९९ लाख ७३ हजार रूपये किमतीच्या या सदनिकेसाठी त्यांनी १० नोव्हेंबर २०१५ पासून कंपनीला वेळोवेळी २१ लाख ३४ हजार ८१ रूपये दिले होती. मात्र सदनिकेच्या खरेदीबाबत कंपनीने त्यांच्याशी करार केला नाही. तसेच ठरल्याप्रमाणे बांधकाम देखील सुरू केले नाही. त्यामुळे आंबेतकर यांनी जून २०१७ मध्ये बुकिंग रद्द करीत पैसे परत देण्याची मागणी केली.

त्यानुसार कंपनीने त्यावेळी त्यांना पाच लाख रूपये परत केले होते. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी आयोगात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होत तक्रारदार यांचे १६ लाख ३४ हजार ८१ रूपये बुकिंग केल्याच्या तारखेपासून नऊ टक्के व्याजाने परत करावेत. तक्रार खर्चापोटी ५० हजार रूपये द्यावेत, असा आदेश फेब्रुवारी २०२३ मध्ये राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला होता.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य