अबब, भारत-पाक सामन्यावेळी अमेरिकेत हॉटेल्सचे दर खिशाला नाही झेपणार

0
1

सध्या IPL चा 17 वा सीजन सुरु आहे. आयपीएल संपल्यानतंर लगेचच 2 जूनपासून T20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कप, वनडे असो किंवा T20 सर्व क्रिकेटप्रेमींना उत्सुक्ता असते, ती भारत-पाकिस्तान सामन्याची. सर्व क्रिकेटप्रेमी या हाय वोल्टेज लढतीचा आनंद घेण्यासाठी आतुर असतात. भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय वोल्टेज सामन्याला आता फक्त 38 दिवस उरले आहेत. दोन वर्षांपूर्वी T20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियात मेलबर्नच्या मैदानावर क्रिकेटप्रेमींनी भारत-पाकिस्तान सामन्याच्या थरार अनुभवला होता. दोन्ही देशांच्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वोत्तम सामना असच वर्णन कराव लागेल. पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने न्यू यॉर्कमध्ये भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार अनुभवायचा आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

मागच्यावर्षी वनडे वर्ल्ड कपच्यावेळी असं कानावर आलं होतं की, चाहत्यांनी अहमदाबादमध्येच थांबण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये बेड बुक केले होते. कारण अहमदाबादच्या सर्व हॉटेल्समधील रुम आधीच फुल्ल झाले होते. आता T20 वर्ल्ड कप 2024 च्या निमित्ताने भारत-पाकिस्तान सामन्यावेळी पुन्हा असंच होऊ शकतं.

अव्वाच्या-सव्वा पैसे मोजावे लागणार

भारत-पाकिस्तान सामन्यावेळी न्यू यॉर्कच्या हॉटेल्समध्ये मुक्कामासाठी प्रचंड पैसे मोजावे लागणार आहेत. त्यावेळेस हॉटेल बुकिंगचे दर 600 टक्क्याने वाढलेले असतील. सध्या 2 मे रोजी हॉटेल्समध्ये एकारात्रीच भाडं 113 डॉलर म्हणजे 9422 रुपये आहे. तेच 9 जूनला भारत-पाकिस्तान सामन्यावेळी 799 डॉलर म्हणजे 66624 रुपये एकारात्रीच भाडं असेल. म्हणजे न्यू यॉर्कला हा सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेट प्रेमींना अव्वाच्या-सव्वा पैसे मोजावे लागतील.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप