गेली दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावर केलेल्या घनाघाती आरपार समाचार घेताना या महाराष्ट्र द्रोही हुकूमशाला काढण्याची हीच योग्य वेळ आहे असा एल्गार करत पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर दिले. महाराष्ट्रात सध्या एक वखवखलेला आत्मा फिरत असून त्यांना तडीपार करण्याची गरज असल्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील वारजे येथे जाहीर सभेतून आव्हान केले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर व बारामती लोकसभा उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ या संयुक्तिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रात सध्या फिरत असलेल्या वखवखलेल्या आत्म्याला रोखण्याची देशभक्त सैनिकांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शपथ घेण्याचे आवाहन करून भाषणाची सुरुवात करत नरेंद्र मोदीयांच्यावरती घणाघात करण्याची एकही संधी सोडली नाही. सध्या महाराष्ट्राची लूट होतेय पण अस्मिता असलेल्या मावळ्यांनी हुकूमशहाच्या हातात महाराष्ट्र जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यामध्ये सभेसाठी जे ठिकाण निवडलं होतं ते खरंच घोडे बाजारासाठी योग्य पण तुमच्याकडे सध्या जमा झालेले सगळे गाढव अन् खेचर असून त्यांची वाहतूक टरबूजाच्या हातगाडीवरुन केली जात आहे. गाढव अन् खेचरांची घोडागाडी महाराष्ट्रात काही बदल करू शकत नाही म्हणून सभांची संख्या वाढली आहे पण एकातरी सभेत दहा वर्षात काय केलं ते खरंच सांगा मगच तूम्ही चिमटे काढा असे आवाहन केले.
आमच्यावर पुत्रप्रेमाचा आरोप केला पण तो जनआशीर्वाद असून ते अमित शहा यांनी आपल्या मुलाला जसे bcci अध्यक्षपद तेवढं सोप्प नाही. महाराष्ट्र गद्दार नाही तो कायम
शुरा मी वंदिले म्हणतो आणि तुम्ही चोरांना मी वंदिले असे म्हणत ‘एका एकेला सबसे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी’असा आरोप करत तुमच्या कठीण काळात हीच सेना तुमच्या सोबत होती असून भाकड जनता पार्टी झाली आहे असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला. पुण्यातून ओबीसी आरक्षणाला धक्का आहे अशी भीती नरेंद्र मोदी यांनी दाखवली परंतु दलितद्रोही विचाराने गोमूत्रधारी पिलावळाचा नेता धनगर अन् मराठा आरक्षण या विषयावर
चकार शब्द काढत नाहीत. शरद पवार हे डेरेदार वृक्ष आहे त्याची छाटणी केली पण त्यासाठी कुऱ्हाडीचा दांडाही त्याचं झाडाचा होता हे खरे दुःख असल्याचेही उध्दव ठाकरे यांनी पुण्यातील वारजे माळवाडी येथील सभेत सांगितले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात पराभव दिसतं असल्याने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पुन्हा यावं लागतेय.
कर्नाटक तामिनाडूमधील 42 जागा असूनही एकत्र मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्येही 88जागी फक्तं 2 टप्पे अन महाराष्ट्रात 5 टप्पे करुन लोकांची फसवणूक केली जात आहे. सध्या महागाईचा दर वाढून 2014 ला 71 रुपये तर 3650 दिवस ज्यांनी राज्य केलं त्यांनी 106 लिटर केलं. 410 चा गॅस आत्ता 1100वर गेला आहे.
नाना पटोले यांनीही तानाशाही सरकार जातेय ही निवडणुक जनतेने हातात घेतली आहे. ज्यांनी राज्यातील उद्योग पळविले अन् एका राज्यांवर प्रेम केलेला पंतप्रधान घालवण्याची ही योग्य वेळ असल्याचे आव्हान केले.