माढ्यात मविआला झटका; फडणवीसांनी पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर येऊन हा मोठा डाव टाकला: तीन सभाही होणारं

0
1

माढा लोकसभा मतदार संघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठींबा दिला आहे. धवलसिंह मोहिते पाटलांच्या महायुतीच्या पाठिंब्याने माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

माढ्यात शरद पवारांच्या तीन सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी देखील तीन सभांची तयारी केली आहे. या सभा आज दिवसभरात पार पडतायत. या सभांपुर्वीच फडणवीसांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्याची तयारी केली होती. यासाठी फडणवीसांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांना गळाला लावलं होतं. आणि आज धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठींबा दिला. धवलसिंह मोहिते पाटलांच्या या पाठिंब्याने माढ्यात महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची आज अकलूजमध्ये सभा पार पडणार आहे. या सभेपुर्वी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांची प्रतापगड या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यासोबत धवलसिंह मोहिते पाटलांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला आणि मोहिते पाटील कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान याआधी माढा लोकसभा मतदार संघात धैर्यशील मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या रूपाने भाजपला हादरे बसले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बॅकफुटवर गेले होते. मात्र आता फडणवीसांनी पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर येऊन मोठा डाव टाकला आहे. फडणवीसांचा हा डाव आता किती फायद्याचा ठरतो? हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे