बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत होणार आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. निधी पाहिजे तर कचा-कचा बटण दाबा, आम्हाला मतदान करा नाहीतर, निधीबाबत हात आखडता घ्यावा लागेल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांचं वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
कचाकचा बटण दाबा, मतदान करा, अजित पवारांचं वक्तव्य
अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर यासंदर्भात अजित पवारांना विचारलं असता, चौकशी करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. बारामतीत भाजप मेळाव्यात अजित पवारांनी भाषणात म्हटलं की, येणाऱ्या निवडणुकीत मी महायुतीचा धर्म पाळणार हा माझा शब्द आहे. आचार संहिता नियम असतात पाळायचे असतात.
निवडणूक आयोगाचा चौकशी करण्याचा अधिकार
मी इंदापूरमध्ये बोललो. ते ग्रामीण भाषेत बोललो, तेच पुण्यात असतो, तर तिथं कचा-कचा नाही चालत ज्या भाषेत चालतं तसेच बोलावं लागतं, चौकशी करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार असं अजित पवार म्हणाले आहेत. जे ठरेल तसा महायुती धर्म आपण पाळू. इंदापूरमध्ये संयुक्त सभा असतील, त्याला मी उपस्थित राहील, मागचं खूप साचलं आहे. इतर पक्ष वेगळे पण भाजप हा शिस्तीचा पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात आलबेल असायचं, असं म्हणत अजित पवारांनी भाजप आणि बाकी पक्षांचा फरक सांगितला आहे.