नातं मैत्रीचं किती नितळ आणि निस्वार्थ याची जाणीव गेली 3 दशक एरंडवणा भागातील नागरिकांना घेत आहेतच कारण या भागात स्वा.वीर सावरकर मित्र मंडळ (ट्रस्ट) एरंडवणे व राम बोरकर मित्र परिवाराच्या वतीने “मैत्री” रक्ताची जपुया ! चला “ रक्तदान ” करूया ! या संकल्पाने …मैत्रीचं ….रक्ताचं जपत अविरत कै. शिरिष तुपे यांच्या स्मरणार्थ सलग ३१व्या वर्षी भव्य रक्तदान यागाचे (शिबिराचे) आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ एप्रिल रोजी शिबिराचे उद्घाटनही मित्र परिवाराच्या साक्षीनेच सकाळी ११.०० वाजता स्वा.वीर सावरकर मित्र मंडळ (ट्रस्ट) एरंडवणे येथे केले जाणार आहे.






गेली 30 वर्ष अविरतपणे हे रक्तदानाचे काम करत असताना असंख्य मित्र यामध्ये जुळले गेले आणि सक्रियपणे सहभागी होत गेले त्यामुळेच आज पर्यंत प्रत्येक वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करताना नवीन नवीन मित्र जुळत जातात ही खरे तर कै. शिरीष तुपे यांची पुण्याई आणि मैत्रीच्या नात्याला अनन्य साधारण महत्व आहे याची जाणीव करून देणारी घटना असल्यामुळे संयोजनासाठी कायमच नवचैतन्य आणि उत्साहाची उर्मी हे या रक्तदान शिबिराचे वैशिष्ठ असल्याचे संयोजक राम बोरकर यांनी सांगितले.
१७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून वाढत्या तापमानाचा विचार करून आयोजन समितीने मतदान शिबिरामध्ये विशेष खबरदारी घेत स्प्रिंगलर आणि कुलर याचीही व्यवस्था केली आहे.










