बाबासाहेबांच्या भव्यदिव्य मिरवणुकीवर शिवडी विभागात ठिकठिकाणी फुलांच्या वर्षांवाने स्वागत

0

विश्वरत्न, विश्ववंदनिय, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती महोत्सवानिमित्त बौद्धजन पंचायत समिती शिवडी विभाग गट क्रमांक १३ आणि संलग्न सर्व शाखा व त्यांचे पंचपदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी विभागाचे गटप्रमुख मा. राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या अध्यक्षतेखाली न भूतो न भविष्यति अशी भव्यदिव्य मिरवणूक भीमसागराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली, प्रथम बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस मा. राजेश घाडगे यांच्या शुभहस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, तद्नंतर ज्योत प्रज्वलन करून शिवडी विभाग कोषाध्यक्ष व बौध्दाचार्य प्रविण तांबे यांच्या सुमधुर आवाजात धार्मिक पूजाविधी संपन्न झाला.

पुढे समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे यांनी उपस्थितीतांना संबोधित करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर भव्यदिव्य अश्या रथामध्ये असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विभाग अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, कार्याध्यक्ष संतोष, जाधव, समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे यांनी पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा शुभारंभ केला ही मिरवणूक विभाग अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, कार्याध्यक्ष संतोष जाधव, सरचिटणीस संदीप मोहिते, कोषाध्यक्ष प्रविण तांबे, उपाध्यक्ष राजेश धोत्रे, हरिष मोरे, प्रमोद लोखंडे, सरचिटणीस नरेश सकपाळे, अजय पवार, प्रमुख सल्लागार सीताराम कांबळे, प्रकाश कासे आदी मान्यवरांनी नियोजनबद्ध पध्दतीने आखलेल्या कार्यक्रमानुसार शिस्तबद्ध पध्दतीने या भव्यदिव्य मिरवणुकीला फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रारंभ झाला, ही मिरवणूक आगेकूच करीत असताना मातोश्री परिसरातील सर्व शाखांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले .

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

भीमनगर येथील भीमनगर जयंती उत्सव मंडळाने ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात स्वागत करीत मिरवणुकीत सहभागी झाले, पुढे अजित धोत्रे, राजू धोत्रे आणि परिवाराने माता रमाई आंबेडकर चौक याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने बाबासाहेबांच्या पुतळ्यावर भव्य पुष्पवर्षाव करून मिरवणुकीचे स्वागत केले, सदर मिरवणुकीत सर्वच वयोगटातील मुले, मुली, स्त्री, पुरुष, जेष्ठ-वरिष्ठ यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली, सदर मिरवणूक आगेकूच करत विश्वशांती मित्र मंडळाच्या पटांगणात येताच तेथील सर्व आबालवृद्ध भीमसैनिकांनी मिरवणुकीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले, पुढे ममता बिल्डिंग येथे ही मोठ्या उत्साहात मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले, तद्नंतर सदर मिरवणूक आगेकूच करत भारत नगर, प्रबुद्ध नगर मधून साठे नगरला पोहोचली तेथे ही सर्व भीमसैनिकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचे स्वागत करीत मिरवणुकीत सहभागी सर्वांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

बाबासाहेबांच्या नातसून आ. मनिषाताई आनंदराज आंबेडकर याही साठे नगर येथे मिरवणुकीत सहभागी झाल्या साठे नगर महिला मंडळाने मनीषाताईची ओवाळणी करीत त्यांचे स्वागत केले, मनीषाताईंनी बाबासाहेबांवर फुलांचा वर्षाव करीत त्यांना मानवंदना अर्पण केली आणि लोटलेल्या अथांग भीमसागराला संबोधित करीत “अशीच आपली संघशक्ती अबाधित ठेवा” असा संदेश देत सर्वांना धन्यवाद दिले, पुढे ही भव्यदिव्य मिरवणूक आगेकूच करीत भोईवाडा नाका येथे पोहोचताच तिथे ही मोठ्या उत्साहात मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

सदर मिरवणुकीत प्रत्येक शाखेच्या महिला मंडळ, जयंती उत्सव मंडळ, शाखांचे कार्यकर्ते, विविध समूह, संघटनांचे कार्यकर्ते, विविध लोकप्रतिनिधी या सर्वांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली, शेवटी भोईवाडा नाका इथे पोहोचल्यानंतर शाखेच्या नियमानुसार मिरवणुकीला पूर्णविराम देत असताना विभाग अध्यक्ष या नात्याने राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी सर्व विभागातील भीमसैनिकांचे, सर्व शाखा त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, महिला मंडळ, जयंती उत्सव मंडळाचे, सल्लागार आणि उपस्थित सर्वांचे आभार मानत असताना विभाग कमिटीने कुठेही गालबोट लागणार नाही अश्या विचारपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीने आखलेला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच कार्याध्यक्ष संतोष जाधव, कोषाध्यक्ष प्रविण तांबे यांचे विशेष आभार मानून लोटलेल्या अथांग भीमसागराला शिस्तबद्ध पद्धतीने शांततेत परतण्यास सांगून मिरवणुक कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती