मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत भावना गवळींची गैरहजरी; भावना गवळींची नाराजी कायम

0
1

पाचवेळा खासदार असलेल्या मात्र यंदाच्या लोकसभेत भावना गवळींची नाराजी कायम आहे. भावना गवळी कोणतं पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहे. भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्याप यश आलेले नाही असेच दिसत आहे. कारण मुख्यमंत्री आज एकनाथ शिंदे यवतमाळ दौऱ्यावर आहेत.. मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेणार आहेत. मात्र नाराज भावना गवळी बैठकीला गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे.

दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत आणि जानकर यांनी भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. सायंकाळी मुख्यमंत्री यवतमाळला जाणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री मंत्री संजय राठोड, खासदार हेमंत पाटील, आमदार मदन येरावार, आमदार निलय नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक, यांच्या सह भाजपचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील महत्त्वाचा मतदारसंघ असलेला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात नाट्यमय घडामोडीनंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजश्री पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार भावना गवळी यांची त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट झाली. या भेटीत भावना गवळी यांच्या राजकीय पुर्नवसनावर चर्चा झाली. तसेच कार्यकर्त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिला. या भेटी नंतर देखील खासदार भावना गवळी नाराज दूर करण्यात यश आलेले दिसत नाही.

जवळपास दीड तास चर्चा

सलग पाच वेळा यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधत्व करणाऱ्या भावना गवळी यांची लोकसभेमधून उमेदवारी डावलण्यात आली. त्यामुळे भावना गवळी नाराज आहेत. मात्र, त्यांची मनधरणी करण्यासाठी शिंदेसेनेचे उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांनी आज भावना गवळी यांच्या रिसोड येथील निवस्थानी भेट दिली. त्यानंतर जवळपास दीड तास चर्चा करत भावना गवळी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भावना गवळी मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी तयार झाल्या.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा

भावना गवळी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील सविस्तर चर्चा झाली आहे. हजारो लोकांच्या समोर भावना गवळी माझी सख्खी बहिण आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही राजकीय अन्याय होणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. त्याच दृष्टीने मुख्यमंत्री कार्यवाही करतील या अनुषंगाने मी भावना गवळी यांच्याशी भेट घेतली असून चर्चा केल्याचा उदय सामंत म्हणाले.