यंदाच्या साखर हंगामात दुष्काळी स्थिती असतानाही राज्यातील अवघ्या २० कारखान्यांनी तब्बल २६८ लाख टन म्हणजेच तब्बल पंचवीस टक्के उसाचे गाळप केले आहे. सर्वाधिक गाळप करणाऱ्या पहिल्या दहा कारखान्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती ॲग्रो, दौंड शुगर, सोमेश्वर आणि माळेगाव असे चार कारखाने आहेत. साखर उताऱ्यात मात्र दालमिया, कुंभी-कासारी, राजारामबापू अशा कोल्हापूर-सांगली पट्ट्यातील कारखान्यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे.
यावर्षी २०७ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला असून १,०५५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापैकी २० कारखान्यांनी पंचवीस टक्के ऊस गाळला आहे. अन्य १८७ कारखान्यांनी ७५ टक्के गाळप केले आहे. बारामती अॅग्रोने सर्वाधिक एकवीस लाख टन तर जरंडेश्वर, दौंड शुगर या खासगी कारखान्यांनी प्रत्येकी १८ लाख टन उसाचा टप्पा ओलांडला आहे.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने साडेअठरा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तुलनेने कमी गाळपक्षमता असतानाही पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर कारखान्याने सातवे तर माळेगाव कारखान्याने नववे स्थान पटकावले आहे. पुणे जिल्ह्याचा पट्टा मध्यम साखर उताऱ्याचा असतानाही सोमेश्वर साखर उताऱ्यात पहिल्या वीसमध्ये आहे.
उताऱ्याबाबत सोमेश्वर व कादवा कारखाने वगळता पहिल्या वीसमध्ये सर्व कारखाने कोल्हापूर, सातारा, सांगली पट्ट्यातील आहेत. दालमिया शुगरने सर्वाधिक तेरा टक्के उतारा मिळवला आहे. तर कुंभी-कासारी, राजारामबापू आणि कुंभी कासारी हे कारखाने त्यापाठोपाठ आहेत.
झालेले गाळप
कारखाना गाळपक्षमता(टन) एकूण गाळप (टन) एकूण साखर(क्विं) साखर उतारा(टक्के)
बारामती अॅग्रो १८,००० २१,५४,७९४ १९,८६,७२५ ९.३३
जरंडेश्वर १०,००० १८,६०,२०० १६,३४,४०० ८.९
विठ्ठलराव शिंदे ११,००० १८,३४,०८२ १८,४९,१०० ९.८८
दौंड शुगर १७,५०० १८,०१,८७७ १७,२६,२०० ९.५७
जवाहर १६,००० १६,१८,३०६ १९,६५,६०० १२.१७
इंडिकॉन १२,५०० १४,२६,२३० १५,२८,००० १०.७३
सोमेश्वर ७,५०० १३,८३,६९५ १६,४९,७५० ११.९०
यशवंतराव मोहिते १२,००० १३,४५,४९० १४,९९,६७० १२
माळेगाव ७,५०० १२,८८,३३० १४,५८,२०० ११.४३
दत्त शिरोळ १२,००० १२,८७,५०० १३,७५,०५० ११.११
तात्यासाहेब कोरे १२,००० १२,०४,८५० १२,३९,१५० १०.९६
गंगामाई शेवगाव ५,५०० ११,५४,१२१ ९,७६,५५० ९.६१
घुले पाटील नेवासा ७,००० ११,३६,४८० ११,४०,७०० १०.२४
क्रांतीअग्रणी लाड ७,५०० १०,९२,२९५ ११,८६,९८ ११.८९
भीमाशंकर ६,००० १०,६७,६०५ १२,२०,६०० ११.४६
सोनहिरा ९,५०० १०,५४,२९० ११,७१,००० १२.०२
पांडुरंग १०,००० १०,३५,३७६ ११,१२,४८५ १०.८४
भाऊसाहेब थोरात ६,००० १०,२५,९१० ११,४८,२३० ११.२५
विठ्ठल ७,५०० १०,२५,४०० १०,४६,३२५ १०.३२
दालमिया शुगर १०,००० १०,१६,५९० १३,१३,९६० १३