शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे रविवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या रॅलीत सहभागी झाले होते. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे. काल काँग्रेसच्या कोठ्यावर जाऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नाचले? त्याचा व्हिडिओ आम्ही दाखवायचा का? असा प्रश्न त्यांनी केला. ‘माँ-बेटे की सरकार’ देश विकत होते. तर बाप-बेटा मुंबई विकत होते, असा आरोप नितेश राणे यांनी केला.






संजय राऊत यांनी तोडले अकलेचे तारे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, अपेक्षेप्रमाणे संजय राऊत यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. नवीन जावई शोध राऊत यांनी लावला आहे. मोदींच्या दौऱ्याचा खर्च किती आहे हे निवडणूक आयोगाला माहीत आहे. उद्धव ठाकरे रविवारी दिल्लीला गेले. त्याचा खर्च किती झाला याची माहिती आधी घ्या. ज्याने साधी ग्रामपंचायत निवडणूक लढविली नाही. ज्यांनी साधी सरपंचपदाची निवडणूक लढवली नाही? तो आचारसंहितेवर बोलत असेल तर हा मोठा विनोद आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
संजय दिना यांचा बळी देण्याचा प्रयत्न
दक्षिण मुंबईची जागा संजय दिना पाटील यांच्या गळ्यात घालून त्यांचा राजकीय बळी दिला आहे. संजय राऊत आम्हाला ज्ञान देत आहे. त्यांच्या भुंकण्याला कोणीही किंमत देत नाही. 4 जून नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहेत. कालच्या इंडिया आघाडी बैठकीत केजरीवालचा बॅनर काढायला लावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची लायकी राहुल गांधी यांनी त्यांनी दाखवली, असे राणे म्हणाले.
दिशा सालियानवर चित्रपट काढा
देवेंद्र फडणवीस यांना मणिपूरला पाठविण्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्याचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, ज्याने स्वतःची अंतवस्त्र सुद्धा स्वतःच्या पैशाने विकत घेतली नाही. ते फडणवीस यांचा मणिपूर दौऱ्याचा खर्च करण्याची भाषा करत आहेत. दिशा सालियान फाईल नावाचा चित्रपट लवकर प्रदर्शित करा. त्यात मुलाला हिरो म्हणून घ्या. मुख्य सूत्रधार तोच आहे, असे राणे यांनी म्हटले.
प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार दिले, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने आपला उमेदवार उभा करावा महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना जे हवं ते दिलं नाही, त्यामुळे त्यांनी आघाडीच्या विरोधात उमेदवार दिला आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले.











