पिंपरी: भारत राष्ट्र समिती राज्य समन्वयकांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा समनव्यकांची बैठकीचे आयोजन करण्यात आली होती. पुणे येथे महाराष्ट्र बी आर एस च्या झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत विविध ठराव सर्वानुमते संमत करून बी आर एस प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्याकडे राज्यस्तरीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. तोपर्यंत चंद्रशेखर राव यांच्या पुढील सुचना येईपर्यंत लोकसभेसाठी महाराष्ट्र बी आर एस ची भुमिका ही तटस्थ राहील असे मत बी आर एस राज्य समन्वयक तथा बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांनी मांडले.
यावेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड, पुणे विभाग समन्वयक बी जे देशमुख, यशपाल भिंगे, नंदु खेरडे, आर्मी सेल प्रमुख संदिप लगड, जगदीश नाना बोंडे, नाना बच्छाव, बाळासाहेब सानप, अनिल पाटील, नागनाथ भिसेवाड, प्रविण फुके, डॉ आपासाहेब कदम, श्रीकृष्ण चाटे, लक्ष्मण वंगे, वसंत शेटकर, दत्ता पवार, सुशिल घोटे, सुधीर बिंदू, माजी आमदार मनोहर पटवारी, विजय देशमुख, शिवाजी आळणे, अनिल पाटील, कैलास तौर, जयमल सिंग, निलिमाताई खेमनर, नागेश वल्याळ, मारोतराव जाधव, दोंदे मॅडम, सोमनाथ थोरात, गणेश कदम, बापुसाहेब पलांडे आदी महाराष्टातील प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
मागच्या वर्षभरात महाराष्ट्रात बी. आर. एस. चे प्रमुख नेते , सर्व समन्वयक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रचार – प्रसार करून भारत राष्ट्र समीतीला लाखो सदस्य व पदाधिकाऱ्यांची नोंदणी करून विकासाचे “तेलंगणा माॅडेल’ व के सी आर. यांचे विचार कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले. तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेथील सत्ता बी. आर. एस. च्या हातुन निसटल्यामुळे नाउमेद होऊन कार्यची गती मंदावलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र बी. आर. एस. चे जेष्ठ नेते माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांचेकडे केलेल्या सूचनेवरून हि राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्यस्तरीय बैठकीत बी आर एस चे शिर्षस्थ नेते मा के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर पुर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला. तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकाच्या अपप्रचार व केलेल्या षंढयंत्रासह सध्या बी आर एस च्या प्रमुख नेत्यांवर ई. डी. सि. बी. आय. व एस. आय. टी. इत्यादी यंत्रणांच्या जाळ्यात अडकवल्या प्रकरणी हात असणाऱ्या विरोधकाचा निषेध व्यक्त करून विविध ठराव संमत करण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील बी आर एस च्या वतीने मा के.सी. आर साहेब यांच्यावर पुर्ण विश्वासाचा ठराव पारित केला. भारत राष्ट्र समीतीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री मा. के चंद्रशेखर राव यांनी लोकसभा निवडणुकीबाबत सुचना केल्यावर तशी भुमिका घेण्यात येईल तोपर्यंत महाराष्ट्र बी आर एस ची भूमिका तटस्थतेची असेल असा निर्णय झाला. महाराष्ट्राची कार्यकारणी जाहीर करुन पक्षबांधनी करण्यात यावी. ईडी, एस आय टी च्या मार्फत केल्या जाणाऱ्या सुडाच्या राजकारणाचा निषेध करण्यात आला.बैठकीत झालेल्या चर्चेचा संपुर्ण वृतांत मा. के. सी. आर. यांच्याकडे पोहचवण्याचे काम बैठकीचे अध्यक्ष मा. शंकर आण्णा धोंडगे यांच्यासह काही प्रमुख करणार आहेत.
बैठकीचे संयोजन विजय मोहिते यांनी केले. उपस्थित प्रमुखाचे स्वागत व आभार शिवाजी जाधव यांनी केले. पिंपरी चिंचवड समन्वयक वाजिद सय्यद, प्रफुलाताई मोतलिंग, हनुमंतराव मोटे, महेश टेळेपाटील, अतुल येवले, राजाभाऊ कदम, प्रकाश बोंडगिरे, आंभोरे पाटील यांच्यासह 200 विधानसभा मतदारसंघातील समन्वयकासह 400 च्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.