वसंत मोरे यांचा यॉर्कर; प्रकाश आंबेडकरांना घालणार साकडे, वंचितच्या तिकीटावर लढणार?

0

राज्यात लोकसभा निवडणुकीत यावेळी अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यात पुण्याचा अग्रक्रम आहे. पुण्यात वसंत मोरे यांच्या खेळीने कोणाची समीकरणं बिघडतात. कोणत्या पक्षाला मनसेतील हे बंड डोकेदुखी ठरते हे येत्या दोन-तीन महिन्यात समोर येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा रामराम केल्यानंतर वसंत मोरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. महाविकास आघाडीने भूमिका जाहीर केल्यावर ते अपक्ष लढणार असल्याची चर्चा रंगली होती. पण सर्वच शक्यता मोडीत काढत वसंत मोरे यांनी यॉर्कर टाकला. मराठा समाजाला जवळ करत पुण्यनगरीत वंचितचा प्रयोग करण्याचे मनाशी पक्कं केले आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

आज प्रकाश आंबेडकर यांची घेणार भेट

वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेणार आहेत. वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांची आज दुपारी भेट होईल. काल पिंपरीत वसंत मोरे यांनीचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली होती.

प्रकाश आंबेडकर यांचा एकला चलो रे

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी काडीमोड घेत राज्यातील काही लोकसभा मतदार संघात उमेदवारांची घोषणा केली. आंबेडकर स्वतः अकोला मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडी आणि मराठा आंदोलक यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. आता या प्रयोगावर राज्यात उलटसुलट चर्चा आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

वसंत मोरे वंचितकडून?

वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे. त्यासाठीच ते प्रकाश आंबेडकर यांना भेटणार आहेत. पुण्यात भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. वसंत मोरे यांनी नुकतीच मराठा समाजाच्या बैठकीत हजेरी सुद्धा लावली होती. त्यात मोरे हे वंचितकडून उभे ठाकल्यास हा सामना चुरशीचा होऊ शकतो.