महायुतीच्या जागावाटपाचा पेच अद्याप कायम आहे. भाजपने आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. शिवसेनेला १३ ते १६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी शिवसेना शिंदे गटाकडून दिल्लीत सादर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या यादीत संभाव्य 13 उमेदवारांचा समावेश असलेली यादी काल रात्री दिल्लीत पाठवल्याची माहिती आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर करण्यात आल्याचं कळतंय.
महायुतीचा जागावाटपाचा तिढा दिल्लीतच सुटणार
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार असल्याचं स्पष्ट होत आहे. महायुतीच्या काही जागांवर पेच कायम असल्याने हा पेच आता दिल्लीतच सुटणार आहे. लवकरच तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत आणखी एक बैठक अमित शाह यांच्यासोबत होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.
कोणत्या जागांवर अद्याप रस्सीखेच?
दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर मध्य मुंबई रत्नागिरी -सिंधुदुर्ग ठाणे धाराशिव गडचिरोली भंडारा – गोंदिया अमरावती परभणी सातारा नाशिक











