शरद पवार गटाची राज ठाकरे यांना ऑफर, विचार करा, भाजपसोबत जाण्याऐवजी…

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहचले आहे. गेली दोन दिवस राज ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजप आणि मनसे युतीची बोलणी आता अंतिम टप्प्यात आहे. भाजप नेते अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आज राज ठाकरे या युतीवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. यामुळे महाविकास आघाडीला हादरा बसला आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांना ऑफर दिली आहे. ही ऑफर शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

काय म्हणाले रोहित पवार

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. त्यांनी मविआ सोबत यावं ही आपली इच्छा आहे. भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा. 2019 मध्ये भाजपने छोट्या पक्षांना फाट्यावर मारले होते. हे लक्षात घ्यावे. आता भाजपसोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाही, म्हणून छोट्या पक्षांना भाव देत आहेत. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील जनता भाजपसोबत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे भाजप लहान-लहान पक्षांना सोबत घेऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे. यामुळे ज्या पक्षांना पाच वर्षांपूर्वी महत्व दिले जात नव्हते, त्यांची आठवण आता भाजपला झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अजित पवार गटातील मंत्र्याचा राजीनामा

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गौप्यस्फोट केला. अजित पवार गटातील एका मंत्र्याने एक-दीड महिन्यांपूर्वी राजीनामा दिला आहे. हा मंत्री कृषी खात्याशी निगडित आहे. शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नावर सध्या चर्चा होत नाही. शेतकरी सध्या वाऱ्यावर आहेत. आता अजित दादा गटातील अनेक आमदार भाजपात जाणार आणि उरलेले आमच्याकडे येणार आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला.