राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी नऊ महिन्यांपूर्वी अजित पवारांसोबत जात शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पक्षबदल करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी सकाळी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आहे.
निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचवेळी ते प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, नुकतंच काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी जाहीर कार्यक्रमामधून आमदार निलेश लंके यांना साद घातल तुरारी हातात घ्या, असं आवाहन केलं होतं. त्यावर निलेश लंके यांनी, नक्कीच याबाबत विचार करु, अशी साद दिली होती. अखेर सोमवारी लंके यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश होत आहे.