कोथरूड एरंडवणे परिसरात शनी मारुती बालगणेश मंडळ या तरुणांनी एकत्र येत रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असताना या जागेची साफसफाई करत “टाकाऊ पासून टिकावू” या विचारातून प्रेरित होऊन… कचरा पेटीच्या जागेचे रूपांतर… सार्वजनिक वाचनालयात…! करून वाचाल तर वाचाल…! हा चांगला संदेश दिला होता परंतु पुणे महानगरपालिकेंनी अजब गजब कारवाई करत मध्यरात्री हे सार्वजनिक आणि सामाजिक हिताचे सार्वजनिक वाचनालय जमीन दोस्त करून कारवाई केल्याची टेंभी मिरवली. विशेष म्हणजे कारवाईला विरोध करणाऱ्या नव तरुणांना (पोलिसांच्या समोरच) मारहाण केल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. एकीकडे रात्रभर सुरू असणारे हॉटेल व्यवसायिक आणि फुटपाथवरच्या गाड्या यामुळे कोथरूड भागातील समस्त नागरिक त्रस्त असताना यांकडून मासिक देवाणघेवाण करणारे हे पथक आज अचानक सार्वजनिक हिताच्या या वाचनालयाच्या विरोधात आले. आणि या कारवाईला विरोध करणाऱ्या तरुणांना बेदम चोप देण्याचा भीम पराक्रम या पथकाने केला आहे कदाचित याबद्दल त्यांचा महापालिकेमध्ये जाहीर सत्कार करण्याची ही गरज निर्माण झालेली आहे.






यामध्ये विशेष बाब म्हणजे हे वाचनालय सुरू करताना पुणे महापालिकेचे आरोग्य विभागाच्या आरोग्य कोटीचे पदाधिकारी ही त्यांच्याशी संपर्कात होते या दोघांच्या संयुक्त विद्यमानेच या रिकाम्या जागेवर कचऱ्याचा उपद्रव वाढत असल्यामुळे स्थानिक मंडळाला बरोबर घेऊन शनी मारुती बालगणेश व दिनानाथ मंगेशकर आरोग्य कोठी पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कचरा पेटीच रूपांतर वाचनालयात कऱण्यात आले आहे. जिथे कचरा टाकण्यात येत होता. घाणीचे साम्राज्य पसरले होते, दुर्गंधी वास येत होता कचरा पेटी झाली होती. नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व महानगर पालिका याचे कर्मचारी यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रबोधन केले. त्याचे रूपांतर एक चांगल्या उपक्रमात झाले. अन मध्यरात्री कारवाई करत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने एक गजब प्रकरण करत आपल्याच सत्य उपक्रमाचे कसे चिंगड्या उडवले आहेत याचे उत्तम उदाहरण सध्या एरंडवणे भागात पाहण्यास मिळत आहे.
कचरा पेटीच रूपांतर वाचनालयात झाले मंडळाचे संस्थापक ज्येष्ठ कार्यकर्ते कै. अरुणभाऊ सातपुते यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावे वाचनालय उभारण्यात आले आहे. त्याचे अनावरण ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांच्या पत्नी श्रीमती सुलोचना अरुण सातपुते व मुलगा श्री संतोष सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यासाठी श्री मंदार बलकवडे यांच्या माध्यमातून सी सी टीव्ही लावण्यात आले. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सचिव
श्री अरुण नीवंगुने, श्री सुनील म्होकर, श्री बाळासाहेब पानगावकर, यांनी वाचण्यासाठी लागणारी ६ वृत्तपत्रे मोफत देऊन, वाचनालासाठी हातभार लावला. त्यावेळी श्री महेश खराटे, कोथरूड ब्लोकचे श्री उमेश कंधारे
युवासेनेचे श्री वैभव दिघे, श्री राजाभाऊ साठे, यांनी मंडळाला विधायक उपक्रमासाठी लागणारी मदत करण्याची ग्वाही दिली. अलंकार पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक सौ संगीता पाटील, कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय मनपा पुणे ब्रँड ॲम्बेसेडर सौ रुपालीताई मगर, आरोग्य कोठीचे निरीक्षक श्रीराहुल शेळके नवयुग मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष ढावरे गणेश नगर मंडळ श्री समीर येनपूरे वसाहती मधील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मारहाणीत अध्यक्ष अन् काही पदाधिकारी जखमी झाले असून ही आघोरी कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे. पुणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या प्रमुख यांनी संबंधित कारवाई न केल्यास अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयात ‘शाहीफेक’ करण्याचा ही इशारा देण्यात आलेला आहे.
एकीकडे राजरोसपणे रस्त्यावरती अतिक्रमण करून रात्रभर व्यवसाय करणाऱ्या लोकांची मलाई खिशात घालण्यासाठी हे फक्त रात्रभर भिका मागत फिरतं आणि सार्वजनिक आणि सामाजिक हेतू पुरस्कर सुरू करण्यात आलेल्या वाचनालयावरती कारवाई करण्याची दुर्बुद्धी यांना सुचते खरंच यांची गाढवावरून धिंड काढण्याची गरज असल्याचे मत मंडळाचे कार्यकर्ते यांनी व्यक्त केले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.












