पुण्यातील पहिल्या थेट परकीय गुंतवणुकीच्या पंचतारांकित हॉस्पिटलचे भूमिपूजन; सुळे पवारांचे पुन्हा हल्ले-प्रतिहल्ले

0

पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३२ मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद बारटक्के रुग्णालयाच्या जागेवर हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. पुण्यातील पहिले हेलीपॅड’सह पंचतारांकित हॉस्पिटल असणार आहे.

या प्रकल्पाबद्दल माहिती देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, या भागात मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखिमीची हमी घेतली असल्याने सर्वदृष्टीने फायदेशीर असा हा प्रकल्प आहे. रुग्णालयाच्या खर्चावरील व्याजाचा दर केवळ सव्वा टक्के असल्याने रुग्णालयातील दरही कमी असतील. रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील.

या प्रकल्पाची 99 टक्के फायनान्शियल आणि पॉलिटिकल रिस्क नेदरलँड्स गव्हरमेंटची एक कंपनी करणार आहे. म्हणजे हॉस्पिटल तर या ठिकाणी होणार आहे. पण दुर्दैवाने जर ते हॉस्पिटल होऊ शकले नाही किंवा अर्धवट राहिले तर त्याचा बोजा हा महानगरपालिकेवर येणार नाही. अशा प्रकारची एखादी दुर्दैवी घटना घडली तर तो नेदरलँड्सची एजन्सी ही बँकरला परत करेल. तसेच मला सांगताना आनंद वाटतो की या प्रकल्पाला केवळ सव्वा टक्क्यांचा रेट ऑफ इंटरेस्टने कर्ज मिळालेले आहे. हे पहिले मॉडेल आहे, हे यशस्वी झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची मॉडेल्स तयार करता येतील. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

रुग्णालयाच्या भूमीपूजनावरून श्रेयवाद, अजितदादांनी कार्यक्रमातच सुळेंना सुनावलं

पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती. या हॉस्पिटलच्या भूमिपूजनावरून पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं समोर आलं आहे.

या कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, मी स्वत: कॅन्सर सर्व्हायवर कुटुंबातून आली आहे. हे रुग्णालय किती महत्त्वाचं आहे, हे मला चांगलं माहिती आहे.वारजे भागासाठी हे हॉस्पिटल नक्कीच फायदेशीर ठरेल. या हॉस्पिटलचे श्रेय आमच्या स्थानिक माजी नगरसेवकांना जातं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. दरम्यान या हॉस्पीटलसाठी राज्य शासनाने कर्जहमी दिल्याची माहिती पेपरातून सारखी येत आहे. यावरून अनेकांकडून शंका विचारल्या जातात, त्यावर शासनाने खुलासा करावा एवढीच विनंती मी करते, असा टोलाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी लगावला.

सुप्रिया सुळे यांनी या हॉस्पिटलचं श्रेय स्थानिक नगरसेवकांना देताच अजित पवार यांनी देखील या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘मित्रांनो या भागात दोन्ही दादांनीच नगरसेवक निवडून आणले आहेत. उगाच इतरांनी बोर्ड लावू नये. मी आणि चंद्रकांतदादांनीच पालकमंञी या नात्याने या भागात विकास कामं केली आहेत, हे इतरांनी लक्षात ठेवावे’ असा टोला अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

यावेळी भाषणात सुप्रिया सुळे यांनी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी कर्जहमीवरून शंका व्यक्त केली. तसंच महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका घ्याव्यात अशी विनंती राज्य सरकारकडे केली. सुप्रिया सुळे यांच्या शंकेचं निरसन देवेंद्र फडणवीस यांनी केलं तर अजित पवार यांनी रखडलेल्या निवडणुकांसदर्भात उत्तर दिलं. याशिवाय हॉस्पिटलबाहेर लागलेल्या श्रेयवादाच्या बॅनरबाजीवरून टोलाही लगावला.

पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. यासोबतच अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, वारजे भागासाठी हे हॉस्पिटल नक्कीच फायदेशीर ठरेल. आता एकच मागणी आहे की, मनपाचे इलेक्शन लवकर घ्या.

सुप्रिया सुळे यांनी मनपाच्या इलेक्शनबाबत केलेल्या मागणीवर अजित पवार यांनी मनपा निवडणुका सर्वोच्च न्यायालयामुळे अडकल्याचं सांगितलं. यात राज्य सरकारची काही भूमिका नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावं. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीमुळे निवडणूक अडकल्याचं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना उत्तर दिलं.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

बॅनरबाजीवरून सुप्रिया सुळे यांना टोला लगावताना अजित पवार म्हणाले की, मिञांनो या भागात दोन्ही दादांनीच नगरसेवकांनाच निवडून आणलंय. उगीच इतरांनी बोर्ड लावू नयेत. मी आणि चंद्रकांत दादांनीच पालकमंञी या नात्याने या भागात विकास कामं केलीत. हे इतरांनी लक्षात ठेवावे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी हॉस्पिटलच्या बांधकामासंदर्भात एक शंका व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, हॉस्पीटलसाठी राज्य शासनाने कर्जहमी दिल्याची माहिती पेपरातून सारखी येतेय. यावरून अनेकांकडून शंका विचारल्या जातात त्यावर शासनाने खुलासा करावा एवढीच विनंती मी करते. सुप्रिया सुळे यांच्या या शंकेवर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हॉस्पिटलचं फायनान्सिंग हे थोडसं वेगळं आहे. हे पहिल्यांदाच होतंय. सुप्रिया ताई मी तुम्हाला सांगतो, आम्ही इथं सॉव्हरिंग गँरटी शासनाने अजिबात दिलेली नाही. जर समजा हा प्रकल्प रखडला तर कर्जाची परतफेड ही नेदरलँडची इंशुरन्स कंपनी भरणार आहे. त्याचा पालिकेवर कुठेही अतिरिक्त बोजा पडणार नाही. हे मी इथं स्पष्ट करू इच्छितो. केवळ सव्वा टक्क्याचा व्याज दर आहे.