पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया म्हणाले, ‘हा अजब निर्णय….’

0

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले. त्यानंतर पक्ष आणि चिन्ह कोणाचं हा निर्णय निवडणूक आयोगाकडे गेला. काही दिवसांपुर्वी निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाला दिल्यानंतर आज पहिल्यांदाच शरद पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष चिन्ह आणि नाव याबाबतचा निवडणूक आयोगाचा निर्णय आश्चर्यकारक आहे, लोक सर्व गोष्टींना समर्थन देणार नाहीत. सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

‘निवडणूक आयोगाने आमचं पक्षाचं नावं आणि चिन्ह काढून घेतलं. आमचा पक्ष दुसऱ्यांना दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, पक्षाची उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून घेऊन दुसऱ्यांना दिला, असं देशात याआधी घडलेलं नव्हतं. पण, ते ही निवडणूक आयोगाने आज करून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत आणि त्यासंबधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे’, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

शरद पवारांच्या गटाला मिळालं नवं नाव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावं मागवली होती त्यांपैकी हे एक नाव आहे. त्यानुसार, निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं असणार आहे.

नवं नावं फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत वैध

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात हे नाव शरद पवार यांच्या गटाला देण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी पक्ष चिन्हाची गरज नसते त्यामुळं चिन्हावर निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय अद्याप दिलेला नाही. त्यामुळं शरद पवार गटाला दिलेलं हे नवं नाव हे राज्यसभा निवडणूक होईपर्यंत अर्थात 27 फेब्रुवारीपर्यंतच वैध असणार आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा