..आणखी एक ठाकरे राजकीय प्रवेशास सज्ज? किशोरी पेडणेकरांच्या ‘त्या’ ट्वीटने नव्या चर्चां सुरू!

0
1

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पूत्र तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू आहे. तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा अनेकदा ऐकायला मिळाल्या आहेत. परंतु, तेजस ठाकरे यांना राजकारणापेक्षा वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्येच जास्त रस असल्याचं नेहमी सांगितलं जातं. गेल्या वर्षी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या वेळी अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, तेजस ठाकरे यांचे मोठे बंधू आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

तेजस ठाकरे यांचा आज २७ वा वाढदिवस आहे. यानिमत्त शिवसैनिकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही तेजस ठाकरे यांना शुभेच्छा देणारं ट्वीट केलं आहे. तसेच हे ट्वीट करताना त्यांनी तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की निसर्गप्रेमी, वाइल्डलाईफ फोटोग्राफर, जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेले सुप्रसिद्ध अभ्यासू वन्यजीव संशोधक तेजस उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ही तोफ लवकरच धडाडणार, विरोधकांसह गद्दारांच्या छातीत धडकी भरवणार!

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

खरंतर वन्यजीव संशोधन हे तेजस ठाकरे यांचं आवडतं क्षेत्र आहे. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. अलिकडेच त्यांनी हिरण्यकेशी मासा, गोड्या पाण्यातला दुर्मिळ खेकडा, पाल आणि सापाच्या नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत