PM मोदींचा NDA खासदारांना संदेश;मुस्लिम महिलांसह रक्षाबंधन करुन प्रत्येक घटकाशी जोडा

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDA मधील खासदारांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारने मुस्लिम महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी ‘तिहेरी तलाक’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी एनडीए खासदारांना मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यास सांगितले आहे. सोमवारी रात्री पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमधील एनडीएच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी ही सूचना केली. सोमवारी पहिल्या दोन बैठका झाल्या. कानपूर-बुंदेलखंड प्रदेशापर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशातील सुमारे ४५ एनडीए खासदारांच्या सभेलाही मोदींनी संबोधित केले आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

या बैठकीत मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवी समाजातील विविध घटकांसाठी केंद्र सरकारच्या विकास उपक्रमांवर चर्चा केली. या बैठकीत सहभागी झालेल्या काही खासदारांनी सांगितले की, पंतप्रधानांनी समाजातील प्रत्येक घटकाशी स्वत:ला जोडण्यावर भर दिला. भाजप पसमंदा (मागास) मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी काम करत आहेत.

वास्तविक या बैठकांच्या माध्यमातून २०२४ च्या निवडणुकीपूर्वी एनडीएतील घटक पक्षांशी संबंध दृढ करण्याची भाजपची रणनीती आहे. सध्या युतीत ३८ पक्ष आहेत. अलीकडे भाजपने पसमंदा मुस्लिमांना जोडण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले. तसेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारिक मन्सूर यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?