प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. शिंदेंच्या कर्तव्यपूर्ती निमित्ताने महात्मा फुले पगडी व घोंगडी देऊन सन्मान

0

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आज दि, 31-7- 2023 रोजी पुणे येथील कार्यालय मधून सेवानिवृत्त झाले, यानिमित्ताने त्यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदान व सेवेबद्दल पुणे शहरातील तमाम रिक्षाचालकांच्या वतीने भव्य दिव्य असा सदैव स्मरणात राहील असा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला, यावेळी रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने जमा झाले होते, महाराष्ट्र रिक्षा पंचायत ,समर्थ सेवा प्रतिष्ठान पुणे रिक्षा फेडरेशन व ऑल इंडिया ऑटो रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

यावेळी डॉ अजित शिंदे यांना महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या हस्ते महात्मा फुले यांची पगडी घालण्यात आली, आनंद तांबे यांच्या शुभहस्ते घोंगडी प्रदान करण्यात आली, तर एकनाथ ढोले यांनी घुंगराची काठी त्यांना भेट दिली,

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर, माजी उपप्रदेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशिकर आरटी ए कमिटीचे माजी सदस्य बाबा शिंदे, प्रकाश झाडे, मोहम्मद शेख, प्रकाश जगताप, लक्ष्मण शेलार, शुभम तांदळे, विलास केमसे पाटील, समर्थ सेवा प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष शुभम तांबे, अर्शद अंसारी, राजेंद्र मारणे, राजेश कडू, कैलास चौधरी, राजेंद्र चव्हाण, संतोष शिंदे, निलेश चौगुले, मारुती साळुंखे, किशोर म्हस्के, किरण आढागळे, अविनाश वाल्हेकर, सचिन कांबळे विजय शेळके, दिलीप धस, राजेश इंगळे, मधुकर वाबळे, दशरथ थोरात, नामदेव राजगुरू, गजानन मानकर, सोपान गोरे, संजय चव्हाण, महाराष्ट्राच्या रणरागिणी महिला संघटनेच्या अध्यक्ष मीनाताई मोरे, मंदाकिनी वनसाळे, वैशाली दिघे सत्वशीला सूर्यवंशी, रवींद्र लंके, प्रवीण शिखरे, किरण एरंडे, आधी उपस्थित होते,

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

यावेळी सत्काराला उत्तर देताना अजित शिंदे म्हणाले, या कार्यालयामध्ये खूप प्रेम आणि सदिच्छा मिळाल्या त्या काम करताना खूप अडचणी होत्या परंतु सर्वांच्या सहकार्यामुळे ते अगदी सोप्या झाल्या सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक काम सुरू ठेवणार असून प्रोफेसर म्हणून यापुढे मी काम करणार आहे असे यावेळी अजित शिंदे म्हणाले,

यावेळी बाबा कांबळे म्हणाले याच कार्यालयासमोरच्या विरोधामध्ये आम्ही मोठ्या आंदोलन उभे केले वेळप्रसंगी मोर्चा आंदोलन केले परंतु अजय शिंदे यांनी या सर्व लढायला कायदेशीर मदत केली हाय कोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही त्यांच्या सहकार्यामुळे जिंकलो आणि रात्री तसेच ओला उबेरला बंदी घालणार हे देशातील पहिले कार्यालय ठरला आहे, कर्तव्य अधिकारी म्हणून अत्यंत चांगलं काम करण्याबरोबरच सामाजिक जाणीव देखील अजित शिंदे यांनी ठेवली आहे, असे बाबा कांबळे म्हणाले,

अधिक वाचा  पुण्यात महायुतीची ताकद आणखी वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरीचे पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर

आनंद तांबे म्हणाले अजित शिंदे यांच्या काळामध्ये पुणे आरटीओ कार्यालयाचा कायापालट झाला कार्यालयात स्वच्छता बरोबरच पारदर्शक कारभार आणि लोक कल्याणकारी कारभार यावर अजित शिंदे यांनी अधिक भर दिला रिक्षा चालकांचे दैनंदिन प्रश्न त्यांनी अधिक सोप्या पद्धतीने सोडवले रिक्षा पासिंग नंतर ताबडतोब फिटनेस देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली, टू व्हीलर बाइक टॅक्सीच्या रॅपिड कंपनीच्या विरोधात त्यांनी मोठा लढा उभा करण्यासाठी रिक्षाचालकांना पाठबळ दिले असे आनंद तांबे म्हणाले,

एकनाथ ढोले म्हणाले या कार्यातील अधिकाऱ्यांशी माझे नेहमी वाद विवाद झाले आहेत परंतु अजित शिंदे यांच्याशी मात्र माझे कधीही वाढदिवस झाले नाही त्यांनी समोर आलेल्या प्रत्येक काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्यामुळे हा संवाद अधिक वाढत गेला या कार्यालयामध्ये नवीन अधिकाऱ्यांचे देखील आम्ही अशाच प्रकारे स्वागत करू व त्यांना सहकार्य देखील करू असे एकनाथ ढोले म्हणाले.

अधिक वाचा  भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत! राजकीय भूकंपही शक्य? एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा

यावेळी ढोल ताशाचा पथक बोलण्यात आले होते व पथकाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांना वाजत गाजत निरोप देण्यात आला याबद्दल अजित शिंदे देखील भारावून गेले व त्यांनी या सर्व प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.