गटारी अंगलट २ गटात धबधब्यावरच हाणामारी; २ तरुण साडेसातशे फूट दरीत; मृतदेह बाहेर काढले

0

जावळी : काल एक भयानक घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सातारा जिल्ह्यातील जावळा तालुक्यातील एकीव गावात काल दोन ग्रुप तिथं पर्यटनासाठी आले होते अशी माहिती मिळाली आहे. त्यावेळी त्या दोन ग्रुपमध्ये मारामारी झाली, घटना स्थळी झालेल्या झटापटीत धबधब्याच्या बाजूला असलेल्या दरीत दोन तरुण पडले. त्यानंतर दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर त्या तरुणांचे मृतदेह पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आणि एका रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढले.

सातारा जिल्ह्यात मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी धबधबे प्रवाहीत झाले आहेत. काल गटारी असल्यामुळे पर्यटन ठिकाणी लोकांनी अधिक गर्दी केली होती. एकीव धबधब्यावर सुध्दा रविवारी सकाळपासून गटारी साजरी करण्यासाठी अधिक गर्दी होती. सातारा जिल्ह्यातील दोन ग्रुप सुद्धा तिथं आले होते. सायंकाळच्या दरम्यान दोन्ही गटात वादावादी झाली. त्यावेळी त्यातले दोन तरुण बाजूला असलेल्या दरीत कोसळले. विशेष म्हणजे साडसातशे फूट दरी असल्यामुळे त्या तरुणांचा जागीचं मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा