सध्या घोडेबाजाराचीच सत्ता! बाळासाहेबांची ‘ती’ योजनाच जालीम उपाय; ठाकरेंची मोठी मागणी

0
1

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान अमरावती येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर मोठं भाष्य केलं असून देशात राईट टू रिकॉल अधिकारावर चर्चा झाली पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे. मी सभांसाठी नव्हे तर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी फिरतोय असेही देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना नाव माझच राहणार

पक्षाचं नाव बदलणं हे निवडणूक आयोगाचं काम नाही. त्यांना तो अधिकारच नाही असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या सगळेजण पाहत आहेत, राजकारणात पक्ष फोडणे ही गोष्ट नवी नव्हती. पण आता लोक पक्ष चोरत आहेत. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिलं होतं.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

ते नाव मी कोणाला घेऊ देणार नाही. नाव देणं हा निवडणूक आयोगाचा आधिकारच नाही. निवडणूक चिन्ह निवडणूक आयोग देऊ शकते, तो त्यांचा अधिकार आहे. पक्षाचं नाव माझंच आहे आणि ते माझ्याकडेच राहील असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडुकांदरम्यान नियमांचं पालन होतंय की नाही ते पाहणं त्यांचं काम आहे. पक्षाचं नाव बदलण्याचा त्यांना अधिकार नाही असेही ठाकरे यांनी ठणकावले.

‘राईट टू रिकॉल’

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, पुर्वी सरकार मतपेटीतून जन्माला येत असे मात्र हल्ली सरकार खोक्यातून जन्माला येत आहे. तुम्ही मतदान कोणालाही करा सरकार माझंच येईल असं बोलायला लागले आणि तसा जर पायंडा पडला तर उद्या जो कोणी दमदाट्या किंवा पैशाचा खेळ करू शकतो तो राज्याचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

म्हणूनच शिवसेनाप्रमुखांनी तेव्हा ‘राइट टू रिकॉल’ योजना मांडली आहे. मी निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधींनी चुक केली असेल, आमच्यासह जो कोणी करेल त्यांना परत बोलवण्याचा अधिकार द्यायला पाहिजे का यावर देशात विचार व्हायला पाहिजे असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

कुणाच्या खांद्यावर….

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना ठाकरे म्हणाले की, सध्या मी मुख्यमंत्री नाहीये, त्यामुळे त्यावर भाष्य करू शकत नाही. पण काल सामना पिक्चरमधील गाणं आठवलं कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.