शरद पवारांना धक्का! माजी मंत्र्यानेही सोडली ५० पदाधिकाऱ्यांसह साथ; अजितदादांना पाठिंबा

0

अजित पवार आणि समर्थक आमदारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर पक्षात फूट पडली. अनेक आमदारांनी, नेत्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे, तर आणखी काही जण पाठिंबा देत आहेत. वर्ध्यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. वर्ध्याचे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आपल्या पन्नास मुख्य पदाधिकाऱ्यांसह सामुहिक राजीनामा दिला आहे.

राजीनामा देताना आपण विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांना पाठिंबा देत असल्याचं माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. सुबोध मोहिते यांनी आपल्या पदाधिकांऱ्यासह राजीनामा दिला. मोहिते यांच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचे आणखी काही मोठे नेते, पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

अजित पवार यांनी शिवसेना भाजप यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. अनेक आमदार अजित पवार यांना पाठिंबा देत आहेत. तर अनेकांनी शरद पवार यांना पाठिंबा देत असल्याचे सांगून अजित पवार यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा पक्ष बांधणी करण्यासाठी राज्यभर दौरे करत आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. त्यांनी शनिवारी छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील येवल्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. त्यातील पहिली सभा नाशिकच्या येवल्यात पार पडली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा