राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी राजकीय घडामोडींना अजुनही वेग!

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यासह ते या भेटीसाठी पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या गोष्टी घडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आहे.

राज ठाकरे हे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. ही भेट नेमकी कोण्यत्या कारणासाठी होत आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचं बोललं जात आहे. पण या भेटीचे अनेक राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर राज्यातील राजकारण आता अधिकच अस्थिर झाल्याचं दिसून येत आहे. कारण यामागे काही नव्या राजकीय समिकरणांची देखील चर्चा केली जात आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन