अजित पवारांसमोरच शिंदे म्हणाले; “अनेक योजना बंद केल्या, मात्र…”

0

गिरणी कामगारांना राज्य सरकारकडून घरे वाटप करण्यात आले. चावी वाटपाचा कार्यक्रम मुंबईत आयोजीत करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे म्हणाले, २० दिवसात आज दुसरा कार्यक्रम आहे आज ४१८ घर दिली. सरकारच्या कामाला गती आहे. गिरणी कामगारांनी घरांची आशा सोडली होती. मात्र हे सरकार सर्वमान्यांच सरकार आहे. घर म्हणजे महत्त्वाचा आणि समाधानाचा दिवस असतो एक स्वप्न असत. गिरणी कामगारांना प्रतिक्षा करावी लागली याची खंत आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

आता दर आठवड्याला कार्यक्रम घेऊ आणि कामांचा सपाटाच लावू. जिकडे कष्ट केले तिकडेच घरे मिळत आहे ही आनंदाची बाब आहे. ३४६७ घरांच टार्गेट आहे ते आपण लवकरच पूर्ण करू, यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम करणार आहोत. जो निर्णय घेतो त्याची अंमलबजावणी देखील आम्ही करतो. गिरणी कामगारांचा त्याग त्या बद्ल सांगायची गरज नाही. बाळासाहेब बोलायचे गिरणी कामगार हा महत्वाचा घटक आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

अडीच वर्षात अनेक योजना बंद केल्या. मात्र आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आधी त्या योजना सुरु केल्या. परवडणारे घर गिरणी कामगारांना मिळालं पाहिजे. त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करू. ४३ हेक्टर जमिन आपण ठाण्यात घेत आहोत. मोदी साहेबांच पण स्वप्न आहे की सर्वांसाठी घर असलं पाहीजे. मुंबईकर रखडलेल्या प्रकल्पांमुळे मुंबईबाहेर फेकला गेला. म्हणून त्यांना परत मुंबईत आणायचे आहेत. प्रकल्पांना चालना देणे हा आमचा हेतू आहे, असे शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बरेच दिवसाचं स्वप्न आज साकार होत आहे. घरं वाटपाचा आणखी एक टप्पा आपण करत आहोत. मुंबई आणि गिरणी कामगार अस एक वेगळ नात. काही नंतर घटना घडल्या. संप झाला, त्याची किंमत मोजावी लागली. गिरणी कामगारांना घरं मिळणे हा त्यांचा हक्क आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे.२५० गिरणी कामगारांना हक्काची घर देत आहोत. आपले ससरकार आल्यानंतर आपण अतिशय वेगाने काम केल. दुर्दैवाने काही मधल्या काळात काम नाही झाली. गिरणी कामगरांची हक्काची घर त्यांना मिळाली पाहिजेत आणि मला आनंद आहे की आज दुसरा कार्यक्रम आपण करत आहोत