राज्यात पुन्हा मोठा धमाका होणार, लवकरच आणखी एका मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी?

0

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा काही नेम नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर आणि आता राष्ट्रवादीचे अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर, अनेकांचा असंच वाटू लागलं आहे. अशातच आता आणखी एका मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे शिवसेना-भाजप महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने राज्यात महाभूकंप झाला आहे. खास करून राष्ट्रवादी काँग्रेसला या भूकंपाचे हादरे बसत आहेत. तर अजित पवार यांच्या सत्तेत येण्याने शिवसेना (शिंदे गट) नाराज असल्याचं बोललं जातंय. आता शिवसेनेची म्हणजेच शिंदे गटाची नाराजी दूर करण्यात आल्याचं बोललं जातयं. यासाठी आता राज्यात लवकरच आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अजित पवारांना ४३ आमदारांचा पाठिंबा?

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पक्षातील ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील सत्तेत राष्ट्रवादीचे ४३ आमदार सहभागी होणार आहेत. विधानपरिषदेतील ६ आमदारही अजित पवार यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. आणि एकूण ३ खासदार अजित पवार यांच्यासह जाण्यास तयार असल्याचं सांगण्यात येत आहे.

एकीकडे अजित पवारांच्या रूपात राष्ट्रवादी काँग्रस सत्तेत सभागी झाली असताना दुसरीकडे मंत्रीमंडळ विस्ताराची वाट पाहत असलेल्या शिवसेनेत चलबिचल सुरू झाली आहे. ही चलबिचल दूर करण्यासाठी लवकरच आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीतील ९० टक्के इच्छुकांची नाराजी दूर करण्यात यश आल्याचं बोललं जात आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या खातेवाटपावर उद्यापर्यंत शिक्कामोर्तब होणार आहे. तसंच महायुतीत असलेल्या घटक पक्षांची समजूत काढण्यात यश आल्याचंही सांगण्यात येत आहे. यामुळे आता नव्या मंत्रिमंडळ विस्तारातून आणखी एक धमाका होणार की नाराजांची वर्णी लागणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.